Rohit Sharma Viral Video: भारतीय संघ उद्या २ मार्च रोजी न्यूझीलंडविरूद्ध स्पर्धेतील अंतिम सराव सामना खेळणार आहे. या सामन्यात मांडीच्या दुखापतीमुळे रोहित शर्मा खेळाणार नाही अशी बातमी समोर होती. मात्र रोहितने काल नेट्समध्ये सराव केला व सरावादरम्यान तो पूर्णत: तंदुरूस्त दिसला. भारतीय कर्णधार रोहित शर्मासोबत मैदानावर एक विनोदी किस्सा घडला.
भारताचा कर्णधार त्याच्या विसरण्याच्या सवयीमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत येतो. रोहित फार विसराळू असल्याचे विराट कोहलीने एका मुलाखतीत सांगितले होते. रोहित कधी विमानात मोबाईल विसरतो, कधी बसमध्ये आयपॉड विसरून येतो तर कधी पासपोर्टच विसरून येतो. इंग्लडविरूद्धच्या मालिकेनंतर तर रोहित ट्रॉफी घ्यायलाच विसरा होता.
झालं असं की, रात्री सराव संपल्यानंतर भारतीय संघ हॉटेलमध्ये जाण्यास निघाला, पण रोहत आपला मोबाईल सरावाच्या ठीकाणीच विसरून आला. बसजवळ आल्यावर त्याच्या लक्षात आले की, तो मोबाईल विसरला आहे. त्यानंतर त्याने आपल्या सहकाऱ्याला मोबाईल घेऊन येण्यासाठी पुन्हा मैदानावर घेऊन येण्यासाठी पाठवले. रोहितचा हा विसरभोळा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भारताच्या पाकिस्तानविरुद्धच्या मागील सामन्यात, कर्णधार रोहित शर्मा आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी फिटनेसच्या समस्येमुळे मैदानाबाहेर होते. राहुलने परिस्थितीबद्दल अपडेट दिले आणि सांगितले की दोन्ही खेळाडू ठीक आहेत आणि संघात कोणतीही दुखापतीची चिंता नाही. 'संघात कोणालाही तंदुरुस्तीची समस्या आहे, असे मला वाटत नाही. त्यामुळे कोणी सामन्याला मुकण्याची शक्यताही कमी आहे. सर्वजण जिममध्ये होते, सराव सत्रात सहभागी झाले आहेत,'असे राहुलने स्पष्ट केले.