नव्या स्मार्टफोन्सचे खुणावणारे फीचर्स...
esakal March 02, 2025 08:45 AM

ऋषिराज तायडे - rushirajtayde@gmail.com

मागील महिन्यात भारतीय बाजारपेठेत रेडमी, वनप्लस, सॅमसंग तसेच इतर अनेक स्मार्टफोन्स सादर झाले. त्यापैकी रेडमीचा नोट १४ प्रो मॅक्स तसेच सॅमसंगच्या एस२५ सीरिजला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर नुकतेच रिअलमी, विवो, पोको, आक्यू या कंपन्यांनीही त्यांचे नवेकोरे स्मार्टफोन्स बाजारात आणले आहेत.

जगातील सर्वात वेगाने वाढणारी स्मार्टफोनची बाजारपेठ म्हणून भारताकडे पाहिले जाते. आर्थिक स्थैर्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची वाढलेली खरेदी क्षमता तसेच केंद्र सरकारकडून रोजगार निर्मितीसाठी मोबाइल उत्पादन व दुरुस्तीसंदर्भात कौशल्यविकासावर भर दिला जात आहे. पर्यायाने इतर देशांच्या तुलनेत भारतात स्मार्टफोन निर्मिती आणि विक्री परवडणारे असल्याचे एका अहवालात नमूद करण्यात आले. २०२५ मध्ये भारतीय बाजारपेठेतही लक्षणीय वाढ होण्याची शक्यता वर्तविली आहे.

सध्या भारतीय ग्राहकांचा कल हा प्रीमियम सेगमेंटकडे वाढला असून, फाइव्ह-जी, एआयसह अन्य अत्याधुनिक आणि नावीन्यपूर्ण फीचर्स असलेल्या स्मार्टफोन्सला मागणी वाढत आहे. टीअर-३ तसेच टीअर-४ शहरांमध्येही हाच ट्रेण्ड दिसत आहे. त्यामुळे आगामी काळात भारतीय स्मार्टफोनच्या बाजारेठेत ५० अब्ज डॉलर्सपेक्षाही अधिक उलाढालीची शक्यता अहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत हे प्रमाण २१ टक्क्यांनी अधिक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्याच अनुषंगाने या वर्षात रेडमी, वनप्लस, सॅमसंगसारख्या नामांकित कंपन्यांनी नवनवीन स्मार्टफोन्स बाजारात आणले. त्यापाठोपाठ आता नुकतेच रिअलमी, विवो, पोको, आक्यू आदी कंपन्यांनीही त्यांचे नवेकोरे स्मार्टफोन्स सादर केले आहेत.

रिअलमी पी३ प्रो ५जी
  • डिस्प्ले : 6.8” FHD+ OLED 120Hz Display

  • प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 7s Gen 3

  • रॅम ः 8 GB, 12 GB

  • स्टोरेज : 128 GB + 256 GB

  • रिअर कॅमेरा : 50 MP + 2 MP

  • फ्रंट कॅमेरा : 16 MP

  • बॅटरी ः 6000 mAh (80W)

  • ऑपरेटिंग सिस्टिम :

  • ॲण्ड्रॉईड 15

  • रंग : नेब्युला ग्लो, गॅलेक्सी पर्पल आणि सॅटर्न ब्राउन

  • किंमत :

  • 8GB+128GB ः 21,999

  • 8GB+256GB ः 24,999

  • 12GB+256GB ः 26,999

विवो व्ही ५०
  • डिस्प्ले : 6.7” FHD+ 120Hz Display

  • प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 7 Gen 3

  • रॅम ः 8 GB, 12 GB

  • स्टोरेज : 128 GB, 256 GB, 512 GB

  • रिअर कॅमेरा :

  • 50 MP + 50 MP

  • फ्रंट कॅमेरा : 50 MP

  • बॅटरी ः 6000 mAh (90W)

  • ऑपरेटिंग सिस्टिम : ॲण्ड्रॉईड 15

  • रंग : रोज रेड, स्टॅरी नाइट, टिटॅनियम ग्रे

  • किंमत :

  • 8 GB RAM + 128 GB ः 34,999

  • 8 GB RAM + 256 GB ः 36,999

  • 12 GB RAM + 512 GB ः 40,999

पोको एक्स७ प्रो
  • डिस्प्ले : 6.7” FHD+ AMOLED 120Hz Display

  • प्रोसेसर : MediaTek Dimensity 8400 Ultra

  • रॅम ः 8 GB, 12 GB

  • स्टोरेज : 256 GB

  • रिअर कॅमेरा :

  • 50 MP + 8 MP

  • फ्रंट कॅमेरा : 20 MP

  • बॅटरी ः 6550 mAh (90W)

  • ऑपरेटिंग सिस्टिम : ॲण्ड्रॉईड v15

  • रंग : पोको यलो, कॉस्मिक सिल्व्हर आणि ग्लेशियर ग्रीन

  • किंमत :

  • 8 GB RAM + 256 GB ः 27,999

  • 12 GB RAM + 256 GB ः 29,999

आयक्यू १३ ५जी
  • डिस्प्ले : 6.82” QHD+ AMOLED 144Hz Display

  • प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 8 Elite

  • रॅम ः 12 GB, 16 GB

  • स्टोरेज : 256 GB, 512 GB

  • रिअर कॅमेरा : 50 MP + 50 MP + 50 MP

  • फ्रंट कॅमेरा : 32 MP

  • बॅटरी ः 6000 mAh (120W)

  • ऑपरेटिंग सिस्टिम : ॲण्ड्रॉईड v15

  • रंग : लिजेंड, नार्डो ग्रे

  • किंमत :

  • 8 GB RAM + 256 GB ः 54,999

  • 12 GB RAM + 256 GB ः 59,999

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.