ओला इलेक्ट्रिक कंपनीने तोटा भरून काढण्यासाठी 1 हजार कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे का? अशी चर्चा सध्या वाहन क्षेत्रात रंगली आहे. आकडेवारी बघितल्यास , कंपनी 1,000 हून अधिक कर्मचारी आणि कंत्राटदारांना कामावरून काढून टाकत असल्याचं बोललं जातंय. तर काही विभागातील कर्मचाऱ्यांना कंपनीने काढूनही टाकले आहे.
भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. ओला ही जगातील सर्वात जास्त विकली जाणारी इलेक्ट्रिक स्कूटर होती. परंतु फेब्रुवारी 2025 मध्ये कंपनीने एकूण 25,000 युनिट्सची विक्री केली आहे, जी गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीच्या तुलनेत 25.86 टक्के कमी आहे.
फेब्रुवारी 2024 मध्ये ओला कंपनीने एकूण 33,722 युनिट्सची विक्री केली होती. दरम्यान, कंपनी आपल्या हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत असल्याची माहिती काल समोर आली होती. पण प्रश्न असा आहे की, एकीकडे कंपनी अनेक स्कूटर लाँच करत आहे आणि दुसरीकडे नोकऱ्या ही देत आहे.
कंपनीचा वाढता तोटा कमी करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. ईटीने दिलेल्या वृत्तानुसार, कंपनी 1,000 हून अधिक कर्मचारी आणि कंत्राटदारांना कामावरून काढून टाकत आहे. कंपनीने अनेक विभागातील कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. गेल्या पाच महिन्यांत दुसऱ्यांदा ही कपात होत आहे.
ऑगस्टमध्ये लिस्टेड झालेल्या या कंपनीला विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. डिसेंबर तिमाहीत कंपनीचा तोटा 50 टक्क्यांनी वाढला. नोकरभरतीच्या बातमीमुळे काल बीएसईवर कंपनीचा शेअर 3.40 टक्क्यांनी घसरून 54.90 रुपयांवर बंद झाला.
किती कर्मचाऱ्यांची कपात केली जात आहे, याबाबत कंपनीने कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली, तरी ऑपरेशनल अॅक्टिव्हिटीजची पुनर्रचना आणि ऑटोमेशनमुळे हे घडत असल्याचे संकेत दिले आहेत. गेल्या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत ओला इलेक्ट्रिकला 376 कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला होता. ओलाच्या तिमाहीत कामकाजातून मिळणारे उत्पन्न 1,045 कोटी रुपये होते, जे गेल्या वर्षी याच तिमाहीत 1,296 कोटी रुपये होते.
नवीन इलेक्ट्रिक वाहने
इलेक्ट्रिक वाहन निर्माती कंपनी ओला इलेक्ट्रिकने शुक्रवारी आपला एस 1 जेन 3 पोर्टफोलिओ लाँच केला, जो इलेक्ट्रिक वाहनांमधील तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पुढील स्तरावर पोहोचला आहे. नवीन पोर्टफोलिओ आता एस 1 एक्स (2 किलोवॉट) साठी 79,999 रुपयांपासून सुरू होतो आणि एस 1 प्रो + 5.3 केडब्ल्यूएचसाठी 1,69,999 रुपयांपर्यंत जातो. जनरेशन 3 पोर्टफोलिओमध्ये सर्वात प्रमुख एस 1 प्रो + 5.3 केडब्ल्यूएच आणि 4 केडब्ल्यूएच आहे, ज्याची किंमत अनुक्रमे 1,69,999 रुपये आणि 1,54,999 रुपये आहे.