'धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला लावावा, त्यांची घटीका जवळ आलीय, हे मला कळतंय पण आता अजित पवार यांनी निर्णय बदलू नये', असे भाजपचे आमदार सुरेश यांनी म्हटलंय.
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काही छायाचित्र समोर आल्यानंतर राज्यातील वातावरण तापलंय. मोकारपंती या ग्रुपमध्ये एका आरोपीनं व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओतील काही छायाचित्र समोर आले आहेत. यानंतर सर्वत्र बाजूनं धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी होत आहे.
दिवंगत संतोष देशमुख हत्या प्रकरणातील छायाचित्रे सोशल माध्यमांमध्ये व्हायरल झाल्यानंतर राज्यातील प्रत्येक नागरीकाच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहिलेलं नसेल. अत्यंत क्रुर पद्धतीनं संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. फोटो व्हायरल होताच मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणीवर नेत्यांनी जोर दिला आहे.
अशातच भाजप आमदार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. 'धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला लावावा, त्यांची घटीका जवळ आलीय, हे मला कळतंय पण आता अजित पवार यांनी निर्णय बदलू नये. त्यांच्या राजीनाम्यामुळे आका आणि त्यांच्या सहकाऱ्यांना बळ मिळणार नाही', असं म्हणालेत.
'संतोष यांच्यावर झालेल्या क्रूर मारहाणीचे छायाचित्र राज्यातील प्रत्येक व्यक्तीनं पाहिलेत. हे फोटो पाहिल्यानंतर प्रत्येक माणूल रडला असेल. इतके भयंकर कृत्य या नराधमांनी केलंय. मुख्यमंत्र्यांचे मी आभार मानतो. कारण त्यांनी सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. आता राजीनामा घेत मुंडेंना ते घरी पाठवतील', असंही धस म्हणालेत.