Travis Head Catch Out By Shubman Gill: भारतीय संघासाठी मागच्या दोन आयसीसी स्पर्धांच्या फायनलमध्ये डोकेदुखी ठरलेला ट्रॅव्हिस हेड ९ व्या षटकात बाद झाला. आपला तिसरा वन-डे सामना खेळणाऱ्या फिरकीपटू वरूण चक्रवर्थीने त्याला ३९ धावांवर बाद केले. वरूणच्या गोलंदाजीवर भारताचा उपकर्णधार शुभमन गिलने सुंदर झेल केला आणि ऑस्ट्रेलियाला दुसरा व सर्वात मोठा धक्का दिला.