Santosh Deshmukh Case: बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने गेले अनेक दिवस राज्यात वाद सुरू आहेत. अशातच काल संतोष देशमुख यांच्या हत्येचे दाहक फोटो समोर आले आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरला. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांनी केलेले भिषण कृत्य समोर आल्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या गुन्ह्याबद्दल सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रकरणावर अनेक कलाकारांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून संताप व्यक्त केला आहे.
मारेकऱ्यांनी यांच्यासोबत अमानवी कृत्य करून हत्या केल्यानंतर महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता पृथ्विक प्रतापने संताप व्यक्त केला आहे. संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर ने संतप्त पोस्ट सोशल मिडीयावर शेअर केली आहे. "मन सुन्न करणारे, मन हेलावून टाकणारे संतापजनक फोटो...संतोष देशमुख यांना न्याय मिळायलाच हवा", असं त्याने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
बीडचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली. राज्यभरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत. याप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी अजूनही फरार आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे.
संतोष देशमुख यांची सुदर्शन घुले आणि त्याचे सहकारी सुधीर सांगळे, प्रतिक घुले आणि फरार आरोपी यांच्याकडून निवस्त्र मारहाण करण्यात आली होती. या तिघांच्या मारहाणीतच संतोष देशमुख यांचा मृत्यू झाला.