Mumbai News: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. त्यामुळे मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधक करीत होते. मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.
त्यांचे पीए प्रशांत जोशी हे राजीनामा घेऊन ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर गेले होते. फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. पुढील कार्यवाहीसाठी मुंडे यांचा राजीनामा राज्यपालांकडे पाठवला असल्याचे फडणवीस यांनी माध्यमांना सांगितले.