राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. धनंजय मुंडेंचे पीए मुंडेंचा राजीनामा घेऊन सागर बंगल्यावर दाखल झाले. त्यांनी मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनाम दिला. बीड जिल्ह्यामधील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मुंडेंवर आरोप होत होते. आज विधीमंडळ सभागृहाचे कामकाज सुरू होण्याआधीच धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री फडणवीसांकडे पाठवला. स्वत: सागर बंगल्यावर ने येता त्यांनी आपल्या पीए प्रशांत जोशीद्वारे मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवला. यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी आपण धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितल्याची प्रतिक्रिया दिली होती.