आष्टा : आष्टा येथे सामायिक क्षेत्रातील जागेवरून झालेल्या वादातून महिलेला मारहाण करण्यात आली. याबाबत आष्टा पोलिस ठाण्यात मानसिंग पंडितराव काटकर, गीता मानसिंग काटकर व प्रणव मानसिंग काटकर (सर्व रा. कदमवेस आष्टा ता. वाळवा) यांच्या विरोधात प्रियांका केदारनाथ काटकर ( वय, ३१ कदमवेस आष्टा ता. वाळवा ) यांनी तक्रार नोंद केली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी वरील दोन्ही काटकर कुटुंबीयांची गट नंबर ७१७ मध्ये असलेल्या सामायिक क्षेत्राबद्दल वाद चालू असून, शनिवारी दुपारी मानसिंग काटकर व कुटुंबीयांनी प्रियांका काटकर यांच्या गोठ्याकडे सामायिक क्षेत्रातून जाण्याचा मार्ग बंद केला होता.
प्रियांका काटकर व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सामायिक क्षेत्रातून गोठ्याकडे जात असल्याचे पाहून मानसिंग काटकर, गीता व प्रणव काटकर यांनी प्रियांका काटकर याना शिवीगाळी करुन जीवे मारणेची धमकी दिली. प्रियांका काटकर यांच्या पतीने रस्ता बंद केल्या बाबत तक्रारीचा अर्ज केल्याचा राग मनात धरून वरील तिघांनी प्रियांका काटकर यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण केली. यात प्रियांका काटकर गंभीर जखमी झाल्या आहेत.