Stocks to Buy: घसरत्या शेअर बाजारात कोणते शेअर्स देणार दमदार रिटर्न्स? ॲक्सिस सिक्युरिटीजने सांगितली यादी
esakal March 05, 2025 12:45 AM

Axis Securities Top Picks: 2025चे पहिले दोन महिने भारतीय शेअर बाजारासाठी खूप आव्हानात्मक होते. या काळात बाजारात जोरदार घसरण झाली आहे. तसेच, प्रमुख बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीसह विविध क्षेत्रांमध्ये घसरण नोंदवण्यात आली.

ब्रोकरेज हाऊस ॲक्सिस सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार, बाजारातील अस्थिरतेमुळे फेब्रुवारीमध्ये गुंतवणूकदार अधिक सावध होते. मिड आणि स्मॉल कॅप अनुक्रमे 11% आणि 13% घसरले, तर निफ्टी-50 फेब्रुवारीमध्ये 6% घसरला.

ब्रोकरेजचे म्हणणे आहे की 2024 मध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर, इक्विटी मार्केटमध्ये जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये घसरण दिसून आली. गेल्या दोन महिन्यांत लार्ज कॅप मार्केटपेक्षा ब्रॉडर मार्केटमध्ये जास्त करेक्शन झाले.

या करेक्शन दरम्यान, 28 फेब्रुवारी 2025 रोजी निफ्टीने नुकताच 22,125चा नीचांक गाठला. त्याच वेळी, मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक उच्चांकावरून अनुक्रमे 21% आणि 25% ने घसरले आहेत.

बाजारातील या घसरणी दरम्यान ब्रोकरेजने मार्च महिन्यासाठी काही निवड केली आहे. तसेच, चांगल्या दर्जाच्या निवडक कंपन्यांच्या स्टॉकवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला आहे.

लार्ज कॅप स्टॉक्स मिड कॅप स्टॉक्स परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची विक्री

परदेशी संस्थागत गुंतवणूकदार (FII) भारतीय शेअर बाजारातून पैसे काढत आहेत. ऑक्टोबरपासून त्यांनी भारतीय बाजारातून 26 अब्ज डॉलरहून अधिक भांडवल काढून घेतले आहे. केवळ सोमवारीच FII ने 4,788 कोटी रुपयांच्या भारतीय शेअर्सची विक्री केली. ही विक्री शेअर बाजारातील घसरणीचे प्रमुख कारण आहे.

जागतिक अनिश्चिततेमुळे, आता यूएस बाँड्स आणि सोन्यासारख्या सुरक्षित मालमत्तांमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत. याशिवाय 'सेल इन इंडिया, बाय इन चायना' या रणनीतीचा परिणामही दिसून येत आहे. परदेशी गुंतवणूकदारांना चीनचे इक्विटी मार्केट भारताच्या तुलनेत स्वस्त वाटत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.