पिंपरी, ता. ४ : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) एकूण शिल्लक असलेल्या २२ गाळे आणि चार रो हाऊसचा ई-लिलाव करण्यात येत आहे. यासाठी इच्छुकांकडून २४ मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत.
पीएमआरडीएच्या पेठ क्र. ३०, कन्व्हेसिंग शॉपिंग सेंटरमधील उर्वरित पाच व्यापारी दुकानांचा समावेश आहे. १२ लाख ६५ हजार २९२ रुपये ते १९ लाख ८१ हजार ६७१ रुपये या दरम्यान त्याची किंमत आहे.
पेठ क्रमांक १२ मधील गृहयोजना क्रमांक एक व दोनमधील १६ दुकानांचा लिलाव होणार आहे. ९ लाख ४८ हजार १२३ ते २० लाख ७७ हजार ३७ रुपये त्याची किंमत आहे. पेठ क्रमांक चार मधील दुकान क्रमांक सहामधील एका दुकानाची किंमत ४३ लाख ८२ हजार ३५१ असून सदर दुकान अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षित आहे. यासह पेठ क्रमांक सहामधील चार रो हाऊस असून रो हाऊस क्रमांक ए-५ ची किंमत १ कोटी २४ लाख ९६ हजार ५९६ रुपये आहे. रो हाऊस क्रमांक बी-६ ची किंमत १ कोटी २४ लाख ७३ हजार ४८८ आहे. रो हाऊस क्रमांक ए-८ ची किंमत १ कोटी २४ लाख ७९ हजार ९३७ आणि रो हाऊस क्रमांक बी -८ ची किंमत १ कोटी ४२ लाख ७५ हजार ५२९ इतकी आहे.
एकूण २२ गाळे, चार रो हाऊस यांचा ई-लिलाव करण्यात येणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी https://eauction.gov.in हे संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे, अशी माहिती आयुक्त योगेश म्हसे यांनी दिली.