मुंबई : भारतीय शेअर बाजारात गेल्या पाच महिन्यांपासून घसरणीचं सत्र सुरु आहे. मात्र, सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये गेल्या 10 दिवसांमध्ये जोरदार घसरण झाली होती. बुधवारी शेअर बाजारात तेजी पुन्हा पाहायला मिळाली. भारतीय शेअर बाजारातील दोन्ही प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी 50 मध्ये तेजी दिसून आली. याचं कारण ऑटो, आयटी आणि एफएमसीजी स्टॉक्समध्ये आलेली तेजी होय. याशिवाय अमेरिकेचा डॉलर तीन महिन्यांच्या निचांकी पातळीवर पोहोचला, याचा देखील परिणाम शेअर बाजारात पाहायला मिळाला.
निफ्टी 50 सलग पाच महिने घसरण्याची वेळ गेल्या 30 वर्षांमध्ये पहिल्यांदा आली होती. मात्र, निफ्टी 50 मध्ये काल तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्समध्ये देखील तेजी पाहायला मिळाली. मात्र, ही तेजी पुढं कायम राहणार की एका दिवसाचा दिलासा होता, हे लवकरच स्पष्ट होईल.
भारतीय शेअर बाजारात ज्या प्रमाणं तेजी पाहायला मिळाली. त्याच प्रमाणं आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये देखील तेजीचं वातावरण दिसून आलं. जर्मनीचा डीएएक्स, फ्रान्सचा सीएसी 40, हाँगकाँगचा हँग सेंग, तैवानचा वेईटेड इंडेक्स यामध्ये देखील तेजी पाहायला मिळाला.
जवळपास एक महिनाभराचा काळ शेअर बाजारासाठी आव्हानात्मक राहिला होता. निफ्टी ऑटोमध्ये 12 टक्के, निफ्टी आयटीमध्ये 11 टक्के, निफ्टी एफएमसीजी 9 टक्क्यांनी घसरल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र, या निर्देशांकात अनुक्रमे 2.6 टक्के, 2.1 टक्के आणि 1.5 टक्के तेजी पाहायला मिळाली.
आयटीसी कंपनीचा शेअर 3.6 टक्क्यांनी वाढला, रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर 1.3 टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा 4.1 टक्के, भारती एअरटेल 2.2 टक्के, इन्फोसिसच्या शेअरमध्ये 1.1 टक्के तेजी पाहायला मिळाली.
निफ्टी 50 मध्ये 1.2 टक्के तेजी पाहायला मिळाली, निफ्टी 50 22337.30 अंकांवर बंद झाला. बीएसई सेन्सेक्स 1 टक्क्यांनी वाढून 73730.23 अंकांवर पर्यंत पोहोचला. निफ्टी स्मॉलकॅप 250 मध्ये 2.7 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली. तर, निफ्टी मिडकॅप 100 मध्ये 2.4 टक्के तेजी दिसून आली.
बीएसईकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार विदेशी संस्थांत्मक गुंतवणूकदारांनी 2895 कोटी रुपयांची विक्री केली. त्याच वेळी भारतीय गुंतवणूकदारांनी 3371 कोटी रुपयांची खरेदी केली. तज्ज्ञांच्या मतानुसार भारतीय गुंतवणूकदारांनी कमी किंमतीत मिळणाऱ्या स्टॉक्सच्या खरेदीवर जोर दिला.
वॅल्यू मेट्रिक्स टेक्नोलॉजीचे सहसंस्थापक आणि सीएफओ चिराग पटेल यांनी निफ्टी 50 निर्देशांकाचं प्राइस करेक्शन 16 टक्क्यांनी झालं असून त्याचं बाजारमूल्य 19 टक्क्यांनी घटलं आहे.1999 पासून निफ्टी 50 एकूण 11 वेळा प्राइस करेक्शन झाल्याचं म्हटलं आहे.
इतर बातम्या :
भारतात श्रीमंत लोकांची संख्या वाढली! नेमकी किती आहे अब्जाधिशांची संख्या? काय सांगतो अहवाल?
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
अधिक पाहा..