MI vs GG: Georgia Voll च्या अर्धशतकाने युपीची दमदार सुरूवात; पण Amelia Kerr च्या ४ विकेट्ससह मुंबईने १५० धावांवर रोखले
esakal March 07, 2025 03:45 AM

MI vs GG WPL 2025: मुंबई इंडियन्सविरूद्ध लखनौमध्ये आज युपी वॉरियर्सने दमदार सुरूवात केली. सलामी फलंदाजांनी ७.६ षटकांत ७४ धावांची भागीदारी केली. पण त्यांच्या विकेट्सनंतर युपी वॉरियर्सचा डाव घरंगळला. युपीने प्रथम फलंदाजी करताना १५० धावा उभारल्या. ज्यामध्ये जॉर्जीया वोलने जलद अर्धशतक ठोकले. मुंबईच्या अमेलिया केरने ४ विकेट्से घेत युपीला रोखण्यात महत्त्वपूर्ण कागगिरी बजाबली. मुंबई इंडियन्सला विजयसाठी १५१ धावांची आवश्यकता आहे.

महिला प्रिमिअर लीगच्या १६ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि युपी वॉरियर्सला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले. पण पहिल्या विकेटसाठी मुंबईला ७४ धावांपर्यंत वाट पाहावी लागली. सलामी फलंदाज ग्रेस हॅरिस व जॉर्जिया वोल यांनी फटेबाजीसह ८ षटकांत ७४ धावा उभारल्या. पण हेली मॅथ्यूजने ग्रेसला २८ धावांवर बाद केले आणि त्यांची भागीदारी तुटली. त्यानंतर मात्र युपीच्या विकेट्स पडण्यास सुरूवात झाली.

ग्रेसच्या जागी फलंदाजीसाठी आलेली किरण नवघीरे शून्यावरच माघारी परतली. त्यानंतर ९० धावांवर गुजरातला मोठा धक्का बसला. सामन्यात जलद अर्धशतक ठोकणाऱ्या जॉर्जीया वोलने मागच्या बाजूला फटका खेळताना स्वत:च स्पंटपवर चेंडू मारला आणि १२ चौकारांच्या मदतीने ३३ चेंडूत ५५ धावा करून बाद झाली.

त्यानंतर युपीचा डाव घरंगळला अमेलिया केरने १५ व्या षटकात सलग दोन विकेट्स घेतल्या. तर हेली मॅथ्यूजने १६ व्या षटकात श्वेता शेहरावतला शून्यावर बाद करत गुजरातला १२१ धावांवर सहावा धक्का दिला. शेवटी मुंबईने २० षटकांत युपीच्या ९ फलंदाजांना माघारी पाठवले व त्यांना १५० धावांवर रोखले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.