सर्वात कठीण परीक्षा UPSC पास करून IAS IPS आणि IFS स्वप्न पूर्ण केलेले काही जण पुढे राजकारणात जातात. मात्र, सगळ्यांनाच यश मिळते असे नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 पासून IAS IPS आणि IFS अधिकारी राहिलेल्या काही जणांना आपल्या मंत्रिमंडळात स्थान दिले. त्यांच्या विषयी जाणून घेऊयात...
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवी हे यांनी सलग दुसऱ्यांदा पंतपधान मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्री झाले आहेत. राजकारणात येण्यापूर्वी ते IAS होते.
पहिल्यांदा IRS आणि नंतर IAS झालेले अर्जून राम मेघवाल हे मोदींच्या मंत्रिमंडळात कायदे मंत्री आहेत.
जयशंकर IFS अधिकारी होते. परराष्ट्र सचिव म्हणून ते निवृत्त झाले. पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात सलग दुसऱ्यांना ते पराराष्ट्र मंत्री झाले आहेत.
आर के सिंग बिहारचे IAS अधिकारी होते. पंतप्रधान मोदी हे पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी काही मोजक्या अधिकाऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले होते त्यामध्ये आर के सिंग यांचा समावेश होता.
हरदीपसिंह पुरी हे 1974 च्या बॅचचे IFS अधिकारी आहेत. 2017 मध्ये पहिल्यांदा त्यांनी पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. सध्या ते पेट्रोलियम मंत्री होते.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त, IPS सत्यपाल सिंह हेही 2017 ते 2019 या पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडाळत मंत्री होते.