Latest Marathi News Updates : राज्यात उन्हाचा तडाखा वाढला; कोकणासाठी IMD चा अलर्ट
esakal March 09, 2025 09:45 AM
Live : सोलापूरमधील शासकीय रुग्णालयात साजरा करण्यात आला जागतिक महिला दिन

सोलापूर शासकीय रुग्णालयात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला आहे. यानिमित्तानं सोलापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं. या शिबिरामध्ये वेगवेगळ्या आजारांची तपासणी करण्यात आली

Weather Update : राज्यात उन्हाचा तडाखा वाढला; कोकणासाठी IMD चा अलर्ट

सूर्य तळपायला लागल्याने राज्यातील तापमानात वाढ होत आहे. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर आणि रत्नागिरीत ३८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली, जी राज्यातील सर्वाधिक होती. त्याचवेळी, नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे ८ अंश सेल्सिअस नीचांकी तापमानाची नोंद झाली. आज राज्यात उन्हाचा तडाखा वाढण्याची शक्यता असून, कोकणातील उष्ण व दमट हवामानामुळे हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. 

Abu Azmi LIVE : अबू आझमींनी सभापती राहुल नार्वेकरांना पत्र लिहून केली निलंबन रद्द करण्याची मागणी

महाराष्ट्र समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अबू आझमी यांनी सभापती राहुल नार्वेकर यांना पत्र लिहून त्यांचे निलंबन रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यांनी लिहिले आहे की, "मी जे काही बोललो ते प्रत्यक्षात इतर अनेक इतिहासकार आणि लेखकांच्या अभ्यासावर आधारित होते. मी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल कोणतेही वादग्रस्त विधान केलेले नाही. मी छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज दोघांचाही आदर करतो. माझे निलंबन रद्द करण्याची मी आदरपूर्वक विनंती करतो."

Gujarat News : वापी परिसरात पहाटे १५ हून अधिक भंगार गोदामे जळून खाक; अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल

गुजरात : वलसाड जिल्ह्यातील वापी परिसरात पहाटे आग लागली. या आगीत १५ हून अधिक भंगार गोदामे जळून खाक झाली. दरम्यान, अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

12th Exam LIVE : पेपरफुटीच्या शक्यतेमुळे हिमाचलमध्ये सर्व परीक्षा केंद्रांवरील बारावीची इंग्रजी परीक्षा रद्द

पेपरफुटीच्या शक्यतेमुळे हिमाचल प्रदेश शालेय शिक्षण मंडळाने मार्च २०२५ च्या सत्रासाठी राज्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर बारावीची इंग्रजी परीक्षा रद्द केली आहे.

International Womens Day LIVE : ठाकरे शिवसेनेतर्फे आज महिलांचा सन्मान

रत्नागिरी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीतर्फे आंतरराष्ट्रीय महिलादिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात यशस्वीरीत्या कार्यरत असलेल्या महिलांना स्वर्गीय मीनाताई ठाकरे सन्मान पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. हा कार्यक्रम ८ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता शहरातील साळवी स्टॉप येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात आहे.

Kavathe Mahankal News : रायवाडीच्या सरपंचास पोलिसाची मारहाण

कवठेमहांकाळ : रायवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील सरपंच राजेश पडळकर यांना येथील पोलिस कर्मचाऱ्यासह दोघांनी मारहाण केल्याप्रकरणी अखिल भारतीय सरपंच परिषदेने मोर्चा काढून निवेदन दिले. मोर्चामध्ये तालुक्यातील सर्व सरपंचांनी सहभाग नोंदवला होता. मारहाणीच्या निषेधार्थ सरपंच परिषदेने तहसील कार्यालय, पोलिस ठाणे व पंचायत समितीला यांना निवेदन दिले.

Paduka Darshan Sohala LIVE : मुंबईत आजपासून भावभक्तीचा भव्यदिव्य उत्सव; मुख्यमंत्री फडणवीस, प्रल्हाद पै यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई : ‘सकाळ माध्यम समूहा’ने आयोजित केलेल्या श्रीगुरू पादुका दर्शन उत्सवासाठी वरळीच्या एनएससीआय डोममध्ये ‘भक्तीचा महाकुंभ’ सज्ज झाला आहे. आज (ता. ८) सकाळी १० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जीवनविद्या मिशनचे प्रल्हाद वामनराव पै यांच्या प्रमुख उपस्थितीत या सोहळ्याचे उद्घाटन होणार आहे. एकाच ठिकाणी २१ संत आणि श्रीगुरूंच्या पादुकांचे दर्शन घेण्याची संधी मिळणार असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांनी नोंदणी केली आहे.

International Womens Day LIVE : जगभरात आज साजरा होणार महिला दिन; विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन

Latest Marathi Live Updates 8 March 2025 : जगभरात आज महिला दिन साजरा होत आहे. त्यामुळे विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. ‘सकाळ माध्यम समूहा’ने आयोजित केलेल्या श्रीगुरू पादुका दर्शन उत्सवासाठी वरळीच्या एनएससीआय डोममध्ये ‘भक्तीचा महाकुंभ’ सज्ज झाला आहे. आज सकाळी १० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जीवनविद्या मिशनचे प्रल्हाद वामनराव पै यांच्या प्रमुख उपस्थितीत या सोहळ्याचे उद्घाटन होणार आहे. तसेच अर्थखातेही सांभाळणारे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कर्नाटकाच्या इतिहासात पहिल्यांदाच २०२५-२६ चा चार लाख कोटींहून अधिकचा अर्थसंकल्प शुक्रवारी सादर केला. हा त्यांचा विक्रमी सोळावा अर्थसंकल्प ठरला. त्याचबरोबर राज्यात अजूनही काही भागांत थंडी कमी झालेली दिसत नाहीये. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.