Navi Mumbai : नवी मुंबईच्या नामांकित हॉटेलमध्ये मेलेला उंदीर, महिनादिनी रेस्टॉरंटचा भोंगळ कारभार
Saam TV March 09, 2025 10:45 PM

नवी मुंबई : नवी मुंबईतील ऐरोली सेक्टर ४ मधील पर्पल बटरफ्लाय हॉटेलमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त जेवायला गेलेल्या महिलांच्या जेवणात चक्क मेलेला उंदीर आढळल्याने एकच खळबळ उडालीय. यासंदर्भात महिलांनी तात्काळ हॉटेल व्यवस्थापनाला जाब विचारला असता व्यवस्थापनाने आपली चूक मान्य केली नाही. मात्र महिलांनी तीव्र विरोध केल्यावर हॉटेल व्यवस्थापनाने आपली चूक मान्य केली. या प्रकरणी महिलांनी रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार केली असता पोलिसांनी रात्री उशिरा हॉटेल विरोधात गुन्हा दाखल केलाय.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.