चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूचा गोल्डन बॉलने सन्मान केला जातो. आत्तापर्यंत ९ वेळा ही स्पर्धा झाली असून प्रत्येक स्पर्धेत कोणाला कोणी हा पुरस्कार जिंकला आहे, जाणून घ्या.
चॅम्पियन्स ट्रॉफी १९९८ स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या जॅक कॅलिसने गोल्डन बॉल जिंकला होता. त्याने ८ विकेट्स घेतल्या होत्या.
चॅम्पियन्स ट्रॉफी २००० स्पर्धेत भारताच्या वेंकटेश प्रसादने गोल्डन बॉल जिंकला होता. त्याने ८ विकेट्स घेतल्या होत्या.
चॅम्पियन्स ट्रॉफी २००२ स्पर्धेत श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरने गोल्डन बॉल जिंकला होता. त्याने १० विकेट्स घेतल्या होत्या.
चॅम्पियन्स ट्रॉफी २००४ स्पर्धेत इंग्लंडच्या अँड्र्यु फ्लिंटॉफने गोल्डन बॉल जिंकला होता. त्याने ९ विकेट्स घेतल्या होत्या.
चॅम्पियन्स ट्रॉफी २००६ स्पर्धेत वेस्ट इंडिजच्या जेरोम टेलरने १३ विकेट्स घेत गोल्डन बॉल जिंकला होता.
चॅम्पियन्स ट्रॉफी २००९ स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या वेन पार्नेलने ११ विकेट्सह गोल्डन बॉल जिंकला होता.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०१३ स्पर्धेत भारताच्या रवींद्र जडेजाने गोल्डन बॉल जिंकला होता. त्याने १२ विकेट्स घेतल्या होत्या.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ स्पर्धेत पाकिस्तानच्या हसन अलीने १३ विकेट्स घेत गोल्डन बॉल जिंकला होता.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत न्यूझीलंडच्या मॅट हेन्रीने गोल्डन बॉल जिंकला आहे. त्याने १० विकेट्स घेतल्या.