मुंबईत आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून निर्धार शिबीर घेण्यात आले आहे. यावेळी उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला आहे. यात त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच महानगरपालिकेच्या निवडणुका घेण्यास महायुती सरकारला सांगितले आहे. मात्र यावेळी त्यांनी एक सत्ताधाऱ्यांकडून शब्द मागितला आहे.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, जो कोणी आमच्यावर येईन त्याचा कल्पमोक्ष करण्याचा ताकद आमच्यात आहे. जसे पुतिन जिंकले, हिटलर पण जिंकला होता. त्यांना 98 टक्के मते मिळाली होती. यांना पण अशीच मते मिळाली आहेत. लांड्या लबाड्या करून मते मिळाली आहेत. इथे पण मुस्लिम ख्रिचन असतील पण ते माझे शिवसैनिक आहेत. तुमच्या सारखे नाही इथे हिंदुत्व करायचे आणि तिकडे दुबईत पाकिस्तानी लोकांसोबत बसायचे, असं नाही, असं म्हणत त्यांनी भाजपवर टीका केली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, मराठी साहित्य संमेलनात मराठी गीत मुस्लिम मुलीने गायले. मुंबई मुक्तीचा लढा बोलणारा, जागा मराठा बोलणार अमर शेख आमचा होता. तो जन संघीय नव्हता. साबीर शेख देखील होता. मोहन भागवत मशिदीत जातात. नरेंद्र मोदी यांना मुस्लिम बटाट्याची भाजी आणि पुऱ्या बनवून द्यायचे. ताजियामध्ये जायचे, तरी तुम्ही हिंदू. पण आम्हाला बोलणार. आता जे यांचे सुरू आहे, त्यात त्याचे आणि यांचे साम्य दिसत नाही का?
उद्धव ठाकरे म्हणाले की, कोस्टल रोड तुमचा नाही, शिवसेनेचा आहे. त्याचे भूमिपूजन मी केले आहे. अटल सेतूचे पहिले गर्डर मी लाँच केले आहे. फक्त तुमच्या मालकांची हुजरेगिरी मी केली नाही म्हणून तुम्ही उद्धव ठाकरे नाही म्हणालात, हो तुम्ही नाहीच आहात. महापालिका निवडणुका आता लावा. कशाला घाबरता? मला तुमच्याकडून एक शपथ हवी आहे बंडखोऱ्या करू नका. आईच्या अस्तित्वाची लढाई आहे. आईशी गद्दारी करू नका. निवडणुकीत पक्ष म्हणून एकजुटीने उभे रहा, जो उमेदवार असेल त्याला निवडून द्या, असा शब्द ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांकडून मागितला आहे.
ते लोक मुंबईला मारायला निघाले आहेत. वन नेशन वन इलेक्शन, यांना सगळं एक एक हवं. आम्हाला तुमचे विधान मान्य नाही. बाबासाहेबांचे संविधान आम्हाला मान्य आहे. हिंदी विरुद्ध आमचा लढा नाही. तोडा फोडा राज्य करा, यासाठी भगवा आपल्याला हाती घ्यायचे आहे. मी मुख्यमंत्री पद सोडले, कारण माझा प्राण वर्षात नाही तुमच्यात आहे. मला यातना तेव्हा नाही झाल्या. पण एक कडवट शिवसैनिक जेव्हा यांच्या समोर जातो तेव्हा यातना होतात, असं त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.
ते म्हणाले की, मी तुम्हाला काहीही देऊ शकत नाही. तरीही तुम्ही माझ्यासोबत राहिलात. कारण शिवसेना प्रामुख्यांची पुण्याई आहे. निवडणूक आयोगाने अन्याय केला. सुप्रीम कोर्टाचा निकाल लागत नाही आहे. रोज नवीन जज येत आहेत. ही असली लोकशाही आपण पुढे नेत आहेत. तरीही मी हातात मशाल घेऊन उभा आहे. माझे वडील चोरले कारण यांना वडील नाही. मी बाळासाहेब ठाकरे असे वडिलांचे नाव लावतो, तसे गद्दारांनी शिवसेना अमित शहा असे नाव लावावे. नाहीतर शिवसेना अदानी असे नाव लावावे.
विधानसभेला आपण गाफिल राहिलो. मित्र पक्ष जॅकेट घालून तयार होते. म्हणजे मी जिंकलो आहे. नंतर मला काँग्रेसवाले भेटले. ते म्हणाले, या जागांच्या वाटमारीमध्ये आपण अडकलो आणि ते जिंकून गेले. संजय राऊतांना घाबरून त्यांनी सोडला. प्रफुल्ल पटेल यांना धुवून स्वच्छ केला. अजित दादांचे 70 हजार कोटी कुठे गेले? असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला आहे.