Crime : पुण्यात चाललेय तरी काय? गुंडांनी निवृत्त PSI च्या घरात घुसून केली मारहाण
Saam TV March 10, 2025 09:45 PM

सचिन जाधव

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे पुणे आणि कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित कऱण्यात आहेत. पुण्यात आज घडलेल्या घटनेनंतर पोलीस सुरक्षित आहेत का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. पुण्यात निवृत्त पीएसआयच्या घरात घुसून गुंडांनी मारहाण केली. परिसरात आज ही धक्कादायक घटना घडली आहे.

पुण्यात निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाला घरात घुसून गुंडांकडून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील चंदन नगर परिसरातील फॉरेस्ट पार्क मध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. किरकोळ वादातून आठ-दहा जणांच्या टोळक्यांनी घरात घुसून बेदम मारहाण केली. याप्रकरणी दाखल कऱण्यात आली असून चौकशी करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घरासमोरील चेंबरचे झाकण तोडल्याच्या संशयावरून आठ ते दहा जणांच्या टोळक्याकडून निवृत्त पीएसआयला मारहाण करण्यात आली. गोरखनाथ एकनाथ शिर्के असे मारहाण झालेल्या निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. फॉरेस्ट पार्क परिसरातील झाकण तुटल्याच्या संशयावरून राजू शंकर देवकर आणि गोविंद कॅनल या दोघांसह येरवडा परिसरातील गुंड प्रवृत्तीच्या टोळक्याकडून निवृत्त पोलीस उपनिरीक्षकांच्या कुटुंबांना बेदम मारहाण झाली.

देवकर यांनी येरवडा परिसरातील काही गुंडांना बोलवून पोलीस निवृत उपनिरीक्षकांना किरकोळ कारणावरून मारहाण केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ⁠या प्रकरणी दहा ते बारा जणांवर विमानतळ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात आहे. निवृत्त पोलिसावर हल्ला झाल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.