Crime : तरूणीकडे पाहून हस्तमैथुन अन् अश्लील चाळे, नागपूरच्या रस्त्यावर तरूणाचे घृणास्पद कृत्य|VIDEO
Saam TV March 10, 2025 09:45 PM

पराग ढोबळे, साम टीव्ही प्रतिनिधी

Nagpur Crime News : नागपूर शहरात भररस्त्यात एका तरूणाने विकृतीचा कळस पार केला आहे. एका तरूणीकडे पाहून भर रस्त्यात अश्लील चाळे करणाऱ्या तरूणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

तरूणीकडून पाहून हस्तमैथुन करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. या प्रकारानंतर एकच खळबळ उडाली आहे. तरुण अश्लील कृत्य करतानाचा व्हिडिओ समोर समोर आला आहे. एका तरुणीने हे वास्तव समोर आणले. बजाज नगर पोलीस याप्रकरणी तपास करत आहे.या प्रकारामुळे नागपूर शहरात संताप व्यक्त केला जात असून, संबंधित तरुणावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

पुण्यातील भरचौकात गौरव आहुजा याने कृत्य केल्यामुळे राज्यात संताप व्यक्त केला जात होता. पुण्यातील ही घटना ताजी असतानाच नागपूरमध्येही एका तरूणाने घृणास्पद कृत्य केलेय. तरूणीकडे पाहत नराधम तरूण हस्तमैथुन करत होता. या घटनेनंतर नागपूरमध्ये एकच संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वर्धा मार्गावरील मध्यवर्ती कारागृहा जवळ असणाऱ्या जॉगिंग ट्रॅकवरील बेंचवर बसलेल्या तरुणीकडे पाहत तरूण अश्लील चाळे करत होता. तरूणीकडे पाहत अन् फोनवर बोलत तरूणाने अश्लील चाळे केले. एका तरूणीने हा व्हिडीओ काढून घटना उजेडात आणली. हस्तमैथुन करताना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

तरूण विकृत कृत्य करत असताना एका तरूणीने हिंमत करत त्याला जाब विचारला. तरुणीने हिंमत दाखवून पोलिसांना फोन लावण्याची भाषा केली असता विकृत पळून गेला. तेथे आणखी तरुणी देखील बसल्या होत्या. पुण्यानंतर नागपूरमध्येही विकृत मानसिकता समोर येत आहे. बजाज नगर पोलीस या अश्लील कृत्य करणाऱ्या तरुणाचा शोध घेत आहेत. रविवारी रात्री 9 वाजताच सुमाराची घटना असल्याची माहिती आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.