शिक्षण सुटलं का? घरबसल्या ‘या’ विद्यापीठांमधून करू शकता डिप्लोमा, जाणून घ्या
GH News March 10, 2025 10:11 PM

आजच्या काळात नोकरीमुळे अनेक जण आपलं शिक्षण मध्येच सोडून देतात. अनेकदा असं होतं की करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी आपल्याला शिक्षण सोडून दयावं लागतं. पण नव्या शैक्षणिक धोरणानुसार उमेदवार दूरस्थ शिक्षणही करू शकतात. याशिवाय जर तुम्ही पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षणमध्येच सोडले असेल तर तेही तुम्ही पूर्ण करू शकता. यासाठी तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे अभ्यास सुरू ठेवू शकता.

आजच्या डिजिटल जगात बऱ्याच विद्यापीठे ऑनलाइन शिक्षण देतात, ज्यामुळे आपण आपली नोकरी न सोडता आपला अभ्यास पुन्हा सुरू करू शकता. या लेखात आज आम्ही तुम्हाला अशा कॉलेजांबद्दल सांगणार आहोत जिथून तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारख्या विषयात डिप्लोमा मिळवू शकता.

दिल्ली युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी

दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी नोकरदार आणि व्यावसायिक लोकांसाठी ऑनलाइन पदविका अभ्यासक्रम सुरू करणार आहे. यात AI आणि उद्योगाशी संबंधित अनेक विषयांचा समावेश आहे. DDU मध्ये प्रत्येक अभ्यासक्रमासाठी एकूण 75 जागा देण्यात आल्या आहेत. मात्र, त्यासाठी उमेदवारांना प्रवेश परीक्षा देणे बंधनकारक असणार आहे. या पदविका अभ्यासक्रमांचा कालावधी 6 महिन्यांचा असेल. या अभ्यासक्रमांचे वर्ग रविवारी तीन तास ऑनलाइन दिले जाणार आहेत.

यामध्ये पहिली परीक्षा, शेवटची परीक्षा आणि असाइनमेंट असे मूल्यमापनाचे तीन टप्पे असतात. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT रुड़की)

IIT रुरकी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स क्षेत्रात ऑनलाइन पदविका अभ्यासक्रम चालवते. या कोर्सेसमध्ये तुम्हाला मशीन लर्निंग, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग आणि डीप लर्निंग या सारख्या विषयांवर सखोल माहिती मिळते. त्याचबरोबर IIT चे नाव तुमचे शिक्षण आणि करिअर आणखी मजबूत करते.

सिक्कीम मणिपाल विद्यापीठ

सिक्कीम मणिपाल विद्यापीठातून आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स या क्षेत्रातील ऑनलाइन डिप्लोमा कोर्स करू शकता. येथे काम करतानाही तांत्रिक कौशल्ये शिकता येतात. विद्यापीठाच्या ऑनलाइन कोर्सची वेळ तुम्ही तुमच्या नॉन वर्किंग टाईमनुसार बदलू शकता.

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स सारख्या विषयांचा ऑनलाइन पदविका अभ्यासक्रमही करता येतो. इग्नूच्या कोर्सचा फायदा म्हणजे तुम्ही तुमच्या सोयीनुसार अभ्यास करू शकता आणि परीक्षा केंद्रांवर जाऊन परीक्षा देऊ शकता. अभ्यासक्रम आणि प्रवेशाशी संबंधित तपशीलासाठी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन माहिती मिळवू शकता.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.