टीम इंडियाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं. टीम इंडियाने रविवारी 9 मार्चला महाअंतिम सामन्यात न्यूझीलंडवर 4 विकेट्सने विजय मिळवला. न्यूझीलंडने विजयासाठी दिलेलं 252 धावांचं आव्हान टीम इंडियाने 49 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून पूर्ण केलं. टीम इंडियाने यासह न्यूझीलंडच्या 25 वर्षांआधीच्या पराभवाची परतफेड केली. न्यूझीलंडने भारताला 2000 साली आयसीसी नॉकआऊट स्पर्धेतील अंतिम सामन्यात पराभूत केलं होतं. तसेच टीम इंडियाची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची तिसरी वेळ ठरली. तर न्यूझीलंडला 2009 नंतर पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत उपविजेता म्हणून समाधान मानावं लागलं.
त्यानंतर आता न्यूझीलंड मायदेशात टी 20i आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील यजमान पाकिस्तानविरुद्ध या दोन्ही मालिकेत भिडणार आहे. टी 20i मालिकेत 5 तर एकदिवसीय मालिकेत 3 सामने खेळवण्यात येणार आहे. टी 20i मालिकेचं आयोजन हे 16 ते 26 मार्च दरम्यान करण्यात आलं आहे. तर त्यानंतर 29 मार्च ते 5 एप्रिल दरम्यान एकदिवसीय मालिकेचा थरार रंगणार आहे.
पाकिस्तान या दोन्ही मालिकांसाठी न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. पीसीबीने काही दिवसांपूर्वीच या दोन्ही मालिकांसाठी संघ जाहीर केला आहे. सलमान अली आगा याला मोहम्मद रिझवान याच्या जागी टी 20i संघांचं कर्णधारपद देण्यात आलं आहे. तर मोहम्मद रिझवान हाच एकदिवसीय मालिकेत नेतृत्व करणार आहे. तर अजून न्यूझीलंडने अजून संघ जाहीर केलेला नाही.
पहिला सामना, 16 मार्च, ख्राईस्टर्चच
दुसरा सामना, 18 मार्च, डुनेडीन, यूनिव्हर्सिटी ओव्हल
तिसरा सामना, 21 मार्च, ऑकलँड
चौथा सामना, 23 मार्च, माउंट मौंगानुई
पाचवा सामना, 26 मार्च, वेलिंग्टन
न्यूझीलंडविरुद्धच्या टी 20i मालिकेसाठी पाकिस्तान टीम : सलमान अली आगा (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), अब्दुल समद, अबरार अहमद, हारिस रौफ, हसन नवाज, जहंदाद खान, खुशदिल शाह, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद अली, मोहम्मद हारिस, मुहम्मद इरफान खान, ओमेर बिन युसुफ, शाहीन शाह आफ्रिदी, सुफियान मुकीम आणि उस्मान खान.
पहिला सामना, शनिवार, 29 मार्च
दुसरा सामना, बुधवार, 2 एप्रिल
तिसरा सामना, शनिवार, 5 एप्रिल.
न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी पाकिस्तान टीम : मोहम्मद रिझवान (कर्णधार), सलमान अली आगा (उपकर्णधार), अब्दुल्ला शफीक, अबरार अहमद, अकिफ जावेद, बाबर आझम, फहीम अश्रफ, इमाम-उल-हक, खुशदिल शाह, मोहम्मद अली, मोहम्मद वसीम जूनियर, मुहम्मद इरफान खान, नसीम शाह, सुफयान मुकीम आणि तय्यब ताहीर.