चॅम्पियन ट्रॉफीमध्ये मॅजिक नाइनची कमाल…विराट कोहली, रोहित शर्मा अन् 9, काय आहे हे गणित
GH News March 10, 2025 10:11 PM

ICC Champions Trophy 2025: भारतीय संघाने चॅम्पियन ट्रॉफीचे विजेतेपद रविवारी मिळवले. या विजेतेपदाचा जल्लोष देशभर साजरा होत आहे. एकही सामना पराभूत नव्हता भारताने हे विजेतेपद मिळवले. अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा पराभव टीम इंडियाने केला. तसेच गेल्या नऊ महिन्यांत भारताला मिळालेले हे दुसरे विजेतेपद आहे. या विजेतेपदात टीम इंडियाच्या सांघिक कामगिरीचे कौतूक होत आहे. तसेच काही वेगळ्या गोष्टीवर चर्चा होत आहे. त्यात नऊ या संख्येबाबत चर्चा होत आहे. भारतीय संघ आणि नऊ या अंकाचे वेगळे गणित जुळून आले आहे. चॅम्पियन ट्रॉफीत यापूर्वी टीम इंडियाने 2002 (श्रीलंका सोबत संयुक्त विजेतेपद) आणि 2013 मध्ये विजेतेपद मिळवले होते.

टीम इंडिया आणि 9 चे गणित

  • विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोन्ही खेळाडू आयसीसी चॅम्पियनचे ९ सामने खेळले आहे.
  • विराट कोहलीच्या टी शर्टचा नंबर १८ आहे. म्हणजे १ आणि ८ या संख्येची बेरीज केल्यावर ९ अंकच येतो.
  • रोहित शर्मा याचा टी शर्टचा नंबर ४५ आहे. म्हणजे ४ आणि ५ या दोन अंकाची बेरीज केल्यावर ९ संख्याच येते.
  • २०२५ या वर्षी भारताने चॅम्पियन ट्रॉफी जिंकली. म्हणजे या वर्षाची बेरीज केल्यावरसुद्धा ९ अंकच येतो.
  • चॅम्पियन ट्रॉफी जिंकल्याची कालची तारख ९ होती.

रोहित शर्माने या खेळाडूचे केले कौतूक

कर्णधार रोहित शर्मा याने टीम इंडियाच्या उत्कृष्ट प्रदर्शनावर बोलताना श्रेयस अय्यर या खेळाडूचे भरभरुन कौतूक केले. रोहित शर्मा याने श्रेयस अय्यर याला ‘साइलेंट हीरो’ म्हटले. अय्यर याने चॅम्पियन ट्रॉफीत भारताकडून सर्वाधिक धावा केल्या आहेत. अंतिम सामन्यात श्रेयस अय्यर याने 48 धावा केल्या. तो या ट्रॉफीत सर्वाधिक धावसंख्या करणारा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आहे. चॅम्पियन ट्रॉफीतील पाच सामन्यात मिळून त्याने एकूण 241 धावा केल्या. रचिन रवींद्र याने सर्वाधिक 263 धावा केल्या.

टीम इंडिया इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.