बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) कायम त्याच्या अभिनय आणि डान्ससाठी ओळखला जातो. आजवर त्यांनी अनेक हिट चित्रपट केले आहेत. त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. विशेषता तरूणाईमध्ये हृतिकाच्या डान्सची क्रेझ पाहायला मिळते. सध्या हृतिक रोशन त्याचा आगामी चित्रपट 'वॉर 2' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मात्र शूटिंग दरम्यान अभिनेता जखमी झाल्याची बातमी समोर आली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, '2' च्या (War 2) शूटिंग दरम्यान सेटवर हृतिक रोशनचा अपघात झाला आहे. त्याच्या पायाला दुखापत झाली असल्यामुळे चित्रपटाचे शूटिंगही पुढे ढकलण्यात आले आहे. 'वॉर 2'ची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. 'वॉर 2'मध्ये तगडी स्टारकास्ट पाहायला मिळत आहे. 'वॉर 2'मध्ये हृतिक रोशनसोबत साऊथ अभिनेता ज्युनियर (Jr NTR ) देखील पाहायला मिळणार आहे.
रोशनच्या पायाला दुखापत 'वॉर 2'साठी ज्युनियर एनटीआरसोबत दमदार ट्रॅकच्या रिहर्सल दरम्यान झाली आहे. पायाला झालेल्या दुखापतीमुळे हृतिक रोशन अस्वस्थ झाला. मीडिया रिपोर्टनुसार, हृतिक रोशनला डॉक्टरांनी चार आठवडे पायाला विश्रांती देण्यास सांगितले आहे. तसेच यापुढे कोणताही धोका पत्करू नये, असा सल्ला देखील दिला आहे. 'वॉर 2'च्या गाण्याचे शूटिंग सध्या लांबणीवर पडले आहे. चित्रपटातील हा हाय-एनर्जी ट्रॅक आता मे महिन्यात शूट होणार आहे.
चाहते हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआरला एकाच पडद्यावर पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. 'वॉर 2' 14 ऑगस्ट 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'वॉर 2' चे दिग्दर्शन अयान मुखर्जीने केले आहे. 'वॉर 2'मध्ये हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआरसोबत कियारा अडवाणी देखील आहे. 'वॉर 2' हा सिद्धार्थ आनंदच्या 'वॉर'चा सिक्वेल आहे.