बांधकाम कंपनी देणार 12.50 रुपयांचा अंतरिम लाभांश, रेकॉर्ड तारीख चालू आठवड्यात
ET Marathi March 11, 2025 02:45 PM
मुंबई : नागरी बांधकाम क्षेत्रातील कंपनी जीआर इन्फ्राप्रोजेक्ट्स 2024-25 या आर्थिक वर्षासाठी आपल्या भागधारकांना प्रति शेअर 12.50 रुपये अंतरिम लाभांश देणार आहे.संचालक मंडळाच्या 7 मार्च रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. लाभांशाची रेकॉर्ड तारीख 13 मार्च 2025 आहे. कंपनीचे मार्केट कॅपजीआर इन्फ्राप्रोजेक्ट्सचे जुने नाव जीआर अग्रवाल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स लिमिटेड होते. कंपनीच्या शेअर्सचे दर्शनी मूल्य 5 रुपये आहे. बीएसईवर शेअर 7 मार्च 2025 रोजी 1034.65 रुपयांवर बंद झाला. तर सोमवारी शेअर्स घसरून 1017 रुपयांवर आला आहे. कंपनीचे मार्केट कॅप 10000 कोटी रुपये आहे. डिसेंबर 2024 च्या अखेरीस प्रवर्तकांकडे जीआर इन्फ्राप्रोजेक्ट्समध्ये 74.70 टक्के हिस्सा होता. शेअर्सची कामगिरीबीएसईच्या आकडेवारीनुसार, एका वर्षात जीआर इन्फ्राप्रोजेक्ट्सचा शेअर्स 17 टक्क्यांनी घसरला आहे. तर 2025 मध्ये आतापर्यंत किंमत 30 टक्क्यांनी घसरली आहे. 26 जून 2024 रोजी शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक 1,859.95 रुपये होता. तर 5 मार्च 2025 रोजी 965.05 रुपयांचा 52 आठवड्यांचा नीचांक होता. डिसेंबर तिमाहीतील नफाऑक्टोबर-डिसेंबर 2024 तिमाहीत जीआर इन्फ्राप्रोजेक्ट्सचा निव्वळ एकत्रित नफा वार्षिक 8 टक्क्यांनी वाढून 262.59 कोटी रुपये झाला आहे. एका वर्षापूर्वी नफा 242.87 कोटी रुपये होता. वर्षभरापूर्वीच्या तिमाहीत ऑपरेशन्समधून एकत्रित महसूल 20 टक्क्यांनी घसरून 1694.50 कोटी रुपयांवर आला आहे. डिसेंबर 2023 तिमाहीत महसूल 2134.02 कोटी रुपये होता.
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.