पीएम मोदी दोन दिवसीय मॉरीशस दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी त्यांनी मंगळवारी तिथले राष्ट्रपती आणि पंतप्रधानांची भेट घेतली. मॉरीशेसच्या पंतप्रधानांनी यावेळी पीएम मोदींसाठी देशातील सर्वोच्च पुरस्कार ‘द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार एंड की ऑफ द इंडियन ओशन’ची घोषणा केली. हा सन्मान मिळवणारे पंतप्रधान मोदी पहिले भारतीय आहेत. कुठल्याही देशातर्फे पंतप्रधान मोदींना देण्यात येणारा हा 21 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे.
मॉरीशसमध्ये मिळालेल्या या सम्मानावर पीएम मोदी म्हणाले की, “मॉरीशसच्या लोकांनी इथल्या सरकारने मला आपला सर्वोच्च नागरिक सम्मान देण्याचा निर्णय घेतला आहे. मी तुमच्या निर्णयाचा नम्रतेने स्वीकार करतो. हा भारत आणि मॉरीशसच्या ऐतिहासिक नात्याचा सम्मान आहे. हा त्या भारतीयांचा सम्मान आहे, ज्यांच्या पिढ्यांनी या भूमीची सेवा केली”
आपण सगळे एकच कुटुंब आहोत
“मी जेव्हा कधी मॉरीशसला येतो, मला असं वाटत मी आपल्याच लोकांमध्ये आलोय. या मातीमध्ये अनेक भारतीयांचा आपल्या वंशजांचा घाम मिसळलेला आहे. आपण सगळे एकच कुटुंब आहोत. 10 वर्षांपूर्वी आजच्याच तारखेला मी मॉरीशसला आलो होतो, त्यावेळी आठवडाभर आधी होळी झाली होती” असं पीएम मोदी म्हणाले.
होळीचा रंग सोबत घेऊन जाणार
“त्यावेळी मी भारतातून भगव्याची उमंग घेऊन इथे आलो होतो. यावेळी मॉरीशेसमधून होळीचा रंग सोबत घेऊन जाणार आहे. मॉरीशेसमधील अनेक कुटुंब महाकुंभला जाऊन आली आहेत. जग हैराण आहे, मानवी इतिहासातील विश्वातील हे सर्वात मोठ समागम होतं. 65-66 कोटी लोक इथे आले होते. महाकुंभच्या वेळचच संगमच पावन जल घेऊन आलो आहे. जे इथल्या गंगा तलावात अर्पण केलं जाईल” असं पीएम मोदी म्हणाले.