सरकारी रेल्वे कंपनीला मिळाली ५५४,६४,००,०० किंमतीच्या प्रकल्पाची ऑर्डर; शेअर्सवर असेल गुंतवणूकदारांची नजर
RVNL Stock In News : रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या नवरत्न पीएसयू रेल विकास निगम लिमिटेड (RVNL) ने एक मोठी अपडेट दिली आहे. शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत रेल्वे सार्वजनिक क्षेत्रातील या कंपनीने म्हटले आहे की त्यांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) कडून देण्यात आलेला एक पायाभूत सुविधा प्रकल्प मिळाला आहे. या प्रकल्पाची किंमत ५५४,६४,००,०० रुपये आहे. मंगळवारी (११ मार्च) रेल्वे पीएसयू शेअर १.४० टक्क्यांनी घसरून ३३०.८० रुपयांवर बंद झाला.एक्सचेंज फाइलिंगमध्ये, रेल्वे कंपनी आरव्हीएनएलने म्हटले की एनएचएआयच्या ५५४.६४ कोटी रुपयांच्या करारासाठी ती सर्वात कमी बोली लावणारी (L१) कंपनी म्हणून समोर आली आहे. या प्रकल्पात आंध्र प्रदेशातील सब्बावरम बायपास (अनकापल्ली-आनंदपुरम कॉरिडॉर) ते एनएच-५१ ६सी च्या शीलानगर जंक्शनला जोडणारा ६-लेन प्रवेश नियंत्रित कनेक्टिव्हिटी रस्ता बांधणे समाविष्ट आहे. हा प्रकल्प ७३० दिवसांत पूर्ण करायचा आहे.हा प्रकल्प हायब्रिड अॅन्युइटी मॉडेल (HAM) अंतर्गत राबविला जाईल. कंपनी रेल्वे प्रकल्पांच्या पलीकडे जाऊन विविधीकरण करत आहे. रस्ते आणि महामार्ग बांधकाम क्षेत्रात आपली उपस्थिती मजबूत करत आहे.
आरव्हीएनएल शेअर्सची बाजारातील कामगिरीरेल्वे पीएसयू शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ६४७ रुपये आणि नीचांक २१३ रुपये आहे. कंपनीचे बीएसई वर बाजार भांडवल ६८,९७२.४६ कोटी रुपये आहे. शेअरच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या ३ आणि ६ महिन्यांत शेअरमध्ये अनुक्रमे ३०% आणि ४०% घसरण झाली आहे. तसेच, गेल्या एका वर्षात हा शेअर ३५ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. तसेच, या शेअरने गेल्या २ वर्षात ३९८%, ३ वर्षात ९१०% आणि ५ वर्षात १७४८% इतका मजबूत परतावा दिला आहे.