इंडस टॉवर, कॅस्ट्रॉल इंडिया, पेट्रोनेट एलएनजी, पीएफसी आदी शेअर्स देणार दमदार परतावा; तज्ज्ञांची संशोधनाच्या आधारावर निवड
ET Marathi March 12, 2025 08:45 PM
Stock In Focus : आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत घडामोडींच्या आधारावर शेअर बाजारात चढ उतार होत असते. बाजाराच्या मोठ्या चढ-उतारातही विशिष्ट घडामोडींच्या आधारावर शेअर्समध्ये गुंतवणुकीचा सल्ला बाजार तज्ज्ञांनी दिला आहे. हे शेअर्स अल्पकालावधीच्या गुंतवणुकीत दमदार परतावा देऊ शकतात. या यादीत इंडस टॉवर, कॅस्ट्रॉल इंडिया, पेट्रोनेट एलएनजी, पीएफसी, डीएलएफ, जीएमआर एअरपोर्ट, मुथूट फायनान्स या शेअर्सचा सामावेश आहे. शेअरखानचे टेक्निकल रिसर्च अ‍ॅनालिस्ट जतीन गेडिया यांनी सूचवलेले शेअर्स इंडस टॉवरतज्ज्ञांनी Indus Tower शेअर्सची खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी प्रति शेअर लक्ष्य ३५५ रुपये असून ३३४ रुपयांचा स्टॉपलॉसही दिला आहे. सध्या हा शेअर ३२३ रुपयांच्या आसपास ट्रेड करीत आहे. कॅस्ट्रॉल इंडियातज्ज्ञांनी Castrol India शेअर्सची खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी प्रति शेअर लक्ष्य २५५ रुपये असून २३६ रुपयांचा स्टॉपलॉसही दिला आहे. सध्या हा शेअर २४२ रुपयांच्या आसपास ट्रेड करीत आहे. पेट्रोनेट एलएनजीतज्ज्ञांनी Petronet LNG शेअर्सची खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी प्रति शेअर लक्ष्य ३०२ रुपये असून २७९ रुपयांचा स्टॉपलॉसही दिला आहे. सध्या हा शेअर २८४ रुपयांच्या आसपास ट्रेड करीत आहे. शेअर बाजार तज्ज्ञ कुणाल बोथ्रा यांनी सूचवलेल शेअर्स पीएफसीतज्ज्ञांनी PFC शेअर्सची खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी प्रति शेअर लक्ष्य ४२० रुपये असून ३८८ रुपयांचा स्टॉपलॉसही दिला आहे. सध्या हा शेअर ३९३ रुपयांच्या आसपास ट्रेड करीत आहे. डीएलएफतज्ज्ञांनी DLF शेअर्सची खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी प्रति शेअर लक्ष्य ७०५ रुपये असून ६६० रुपयांचा स्टॉपलॉसही दिला आहे. सध्या हा शेअर ६६६ रुपयांच्या आसपास ट्रेड करीत आहे. शेअर बाजार तज्ज्ञ नुरेश मेराणी यांनी सूचवलेल शेअर्स जीएमआर एअरपोर्टतज्ज्ञांनी GMR Airport शेअर्सची खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी प्रति शेअर लक्ष्य ८५ रुपये असून ७२ रुपयांचा स्टॉपलॉसही दिला आहे. सध्या हा शेअर ७३.७५ रुपयांच्या आसपास ट्रेड करीत आहे. मुथूट फायनान्सतज्ज्ञांनी Muthoot Finance शेअर्सची खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी प्रति शेअर लक्ष्य २३०० रुपये असून २१२० रुपयांचा स्टॉपलॉसही दिला आहे. सध्या हा शेअर २१९१ रुपयांच्या आसपास ट्रेड करीत आहे. (Disclaimer: ब्रोकरेज फर्म /तज्ज्ञांनी दिलेल्या शिफारसी, सूचना, मते आणि सल्ला ही त्यांची स्वतःची आहेत. हे 'इकॉनॉमिक टाइम्स मराठी'च्या मतांचे प्रतिनिधित्व करत नाहीत.)
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.