रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी गुरुवारी सांगितले, की रशियाने युक्रेनमध्ये युद्धबंदीच्या अमेरिकेच्या प्रस्तावाला तत्वतः पाठिंबा दिला आहे. परंतु, त्यांनी अनेक स्पष्टीकरणे आणि अटी मागितल्या आहेत. ज्यामुळे लढाई लवकर संपण्याची शक्यता नाकारता येत नाही,” असे रॉयटर्सने वृत्त दिले आहे.
जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा साखरपुडा १० एप्रिलला होणार असल्याची माहिती आहे. साखरपुड्याचे निमंत्रण भावी वधू-वरांनी शरद पवार यांना दिले आहे. ऋतुजा पाटील या फलटणच्या असून फलटणचे प्रवीण पाटील यांच्या त्या कन्या आहेत.
Pune Metro Service LIVE : आज सकाळी ६ ते दुपारी ३ पर्यंत पुणे मेट्रो सेवा राहणार बंद; धुळवडनिमित्त मेट्रोच्या वेळापत्रकात बदलधुळवड सणानिमित्त पुणे मेट्रोची प्रवासी सेवा सकाळी ६ ते दुपारी ३ पर्यंत बंद राहणार आहे. दुपारी ३ ते रात्री ११ पर्यंत पुणे मेट्रोची सेवा नियमित सुरू राहणार आहे. पुणे मेट्रो रेलने याबाबत प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे.
Holi Festival LIVE : सूर्य उगवण्याआधीच बंजारा समाज बांधवांकडून होळीचे दहननांदेड : नांदेड शहरापासून जवळच असलेल्या रामेश्वर तांडा येथे आज शुक्रवारी (ता. १४) सूर्य उगवण्याआधी बंजारा समाजाच्या बांधवांनी होळी दहन केले. पारंपरिक होळी म्हणजे तांड्यावरील महिला, पुरुष, लहान बालके यांच्यासाठी एक पर्वणीच आहे. या उत्सवात मोठ्या प्रमाणात सहभागी होत पारंपरिक उत्सवाचा बांधवांनी आनंद घेतला.
Nagpur District Bank LIVE : नागपूर जिल्हा बँकेवर राज्य बँक प्रशासक नियुक्तमुंबई : तोट्यात असलेल्या नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर राज्य शासनाने, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची बँकेवर प्राधिकृत अधिकारी (संस्थात्मक प्रशासक) म्हणून नियुक्ती केली आहे. सहकार क्षेत्राच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारे बँकेवर संस्थात्मक प्रशासक नियुक्त झाल्याचे सांगितले जात आहे.
Dhayari Fire LIVE : धायरीत कचरा प्रकल्पाला भीषण आग; पंधराहून अधिक अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखलपहाटे अडीच ते तीनच्या सुमारास धायरी येथील पारी कंपनी जवळील कचरा प्रकल्पाला भीषण आग लागली असून पंधराहून अधिक अग्निशमन दलाचे बंब बोलवण्यात आले आहेत.
Kerala Red Alert LIVE : अतिनील किरणोत्सर्गामुळे केरळमध्ये 'रेड अलर्ट'तिरुअनंतपुरम : केरळ राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (केएसडीएमए) गुरुवारी केरळच्या पलक्कड जिल्ह्यात अतिनील किरणोत्सर्गाचे उच्च प्रमाण आढळल्यानंतर रेड अलर्ट जाहीर केला.
Belgaum-Nagpur Flight LIVE : बेळगाव-नागपूर विमानसेवा होणार बंदLatest Marathi Live Updates 14 March 2025 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासीयांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा आनंदाचा सण प्रत्येकाच्या आयुष्यात नवीन उत्साह आणि ऊर्जा निर्माण करो, असं त्यांनी म्हटलंय. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलच्या किमतीत झालेली घट, देशांतर्गत चलनवाढ व औद्योगिक विकासाबाबत जाहीर झालेल्या सकारात्मक आकडेवारीनंतर आज डॉलरच्या तुलनेत रुपयाची सुधारणा झाली आहे. रुपया २७ पैशांनी वधारला. तसेच उत्तम प्रतिसाद असूनही बेळगाव ते नागपूर दरम्यानची विमानसेवा १५ एप्रिलपासून बंद होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार आणि तमिळनाडू सरकार यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून भाषेच्या मुद्द्यावरून जोरदार वाद सुरू आहे. त्याचा आणखी भडका उडाला. तमिळनाडू सरकारने राज्याच्या २०२५-२६ च्या अर्थसंकल्प सादर करण्याच्या कागदपत्रात रुपयाच्या ₹ या चिन्हाऐवजी तमिळ भाषेतील ‘रुबई’ (तमिळमध्ये रुपये) चे नवे चिन्ह वापरले आहे. मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी घेतलेल्या निर्णयामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. तर, लाडक्या बहिणींच्या निधीसाठी समाज कल्याण विभागाचे ७ हजार कोटी वळवल्याचा आरोप केला जात आहे. त्याचबरोबर राज्यातील वातावरणात आता बदल पहायला मिळत आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..