आपटाळे, ता. १४ : कुसूर (ता. जुन्नर) येथे शॉर्टसर्किटमुळे १५ एकरमधील काढणीला आलेला उसाला गुरुवारी (ता.१३) आग लागली. या आगीचा उसासह इतर पिकांचेही नुकसान फटका बसला. या घटनेत अक्षय ठोसर, शहाजी दुराफे, आदेश जाधव या शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे झाले. त्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली जात आहे.
कुसूर येथे शेतातील ऊस तोडण्यासाठी आलेल्या हार्वेस्टरला विजेच्या तारांना धक्का लागला. यामुळे शॉर्टसर्किट होऊन जवळपास १५ एकर क्षेत्रातील काढणीच्या अवस्थेतील ऊस पिकांसह ठिबक सिंचन, पाइपलाइन, फिल्टर, मल्चिंग पेपर, आंबा व इतर फळझाडे आदी संपूर्णपणे खाक झाले. उन्हाची तीव्रता अधिक असल्याने आग वेगाने पसरली. स्थानिक शेतकरी आणि अग्निशामक दलाच्या सहकार्याने तीन तासानंतर आग आटोक्यात आली. विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर व अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
02449