अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगरमध्ये लाकडी दांड्याने दुकानाची तोडफोड झालीय. किरकोळ कारणामुळे झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर हाणामारीत झालं. त्यानंतर दुकानाची तोडफोड करण्यात आली. या तोडफोडीची घटना CCTV मध्ये कैद. तर मारहाणीत एक युवक जखमी झालाय. गुरुवारी रात्री उशिरा हातात काठ्या, रॉड घेऊन दुकान, दुचाकी गाड्यांची तोडफोड करण्यात आलीय. जखमीला उपचारर्थ रुग्णालयात केले दाखल करण्यात आले आहे.
Live : 'आमच्याकडे या अन् मुख्यमंत्री व्हा', नाना पटोलेंची अजित पवार अन् एकनाथ शिंदेंना ऑफरकाँग्रेस नेते नाना पटोले यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना थेट मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिलीये. साम वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीसोबत बोलताना नाना पटोलेंनी ही राजकीय होळीची ऑफर दिलीय. नाना पटोले यांनी सत्ताधारी नेत्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना खास पद्धतीत होळीच्या शुभेच्छा दिल्या. याचवेळी काँग्रेसमध्ये या आणि सीएम व्हा! अशी ऑफर पटोलेंनी अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना दिलीय.
संतोष देशमुख प्रकरणातील निलंबित पोलीस अन् न्यायाधीश सोबत खेळले होळीचा रंग, मराठा क्रांती मोर्चाचा आरोपमस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ज्या निर्गुणपणे हत्या झाली व त्या प्रकरणामुळे निलंबित असलेले पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील व याच हत्याकांडामुळे सक्तीचा रजेवर पाठवलेले पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन हे दोघेही या प्रकरणातील जी केस चालू आहे, ती केस केज या कोर्टात चालू आहे आणि केज या कोर्टातले न्यायाधीश जे हे प्रकरण त्यांच्याकडे आहे, असे न्यायाधीश राजेश भाजीपाले साहेब यांच्यासोबत हे दोन्ही पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक आज धुळवड साजरी करीत आहेत, असा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या अनिकेत देशमाने यांनी केला आहे.
Nandurbar Live : लाखो आदिवासी बांधवांच्या साक्षीने पारंपरिक काठी संस्थांची राजवाडी होळी संपन्नआदिवासी समाज जीवनातला सर्वात महत्त्वपूर्ण असलेला होळीचा सण सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये मोठ्या उत्साहात पार पडतोय.
नंदुरबार जिल्ह्यातल्या सातपुडा मध्ये साजरी होणारी काठीची राजवाडी होळी ही मोठ्या थाटात संपन्न झाली.
या होळीनंतर सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये आता येणाऱ्या पाच दिवस होळीची धूम पाहायला मिळेल.
Punjab Live :दूध आणायला गेलेल्या शिवसेना जिल्हा प्रमुखाची गोळी घालून हत्यापंजाबमधील मोगा येथे शिवसेना जिल्हा प्रमुख मंगत राय मंगा यांची अज्ञात व्यक्तींनी गोळ्या घालून हत्या केली. मंगत राय मंगा हे बऱ्याच काळापासून शिवसेनेशी संबंधित होते. गुरुवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास, मंगा दूध आणण्यासाठी मोगा येथील गिल पॅलेसजवळील एका डेअरीत गेले होते, तिथे तीन गुंडांनी त्यांच्यावर गोळीबार केला.
Live : सतीश उर्फ खोक्या भोसलेला सात दिवसांची पोलीस कोठडीसतीश उर्फ खोक्या भोसलेला आज शिरूर कासार दिवाणी व फौजदारी न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी केलेली कोठडीची मागणी मान्य करत न्यायाधीश अक्षय जगताप यांनी खोक्या भोसलेला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
Live : ''पक्षाच्या हिताचा निर्णय एकत्रित मिळून घेऊ'' जयंत पाटलांचं मोठं विधानजयंत पाटील राष्ट्रवादी पक्ष सोडणार अशा चर्चा असतानाच त्यांनी केलेल्या विधानाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. ''पक्षाच्या हिताचा निर्णय एकत्रित मिळून घेऊ" असं ते म्हणाले.
Mumbai Live : मुंबईत पोलिसांनी केली नाकाबंदी ; टवाळखोरांवर बारीक लक्षरंगपंचमीमुळे पोलिसांनी मुंबईत ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे. मद्यधुंद चालकांवर कारवाई केली जात असून टवाळखोर ग्रुपवर देखील पोलिसांची बारीक नजर आहे.
सातपुड्यात ७०० वर्षांची परंपरा जपणाऱ्या आदिवासी होळी उत्सवाला सुरुवात!पारंपरिक वाद्यांच्या गजरात राजवाडी होळी दहन संपन्न!
PM Modi LiveUpdate: अमेरिकेनं दिलेल्या युध्दबंदी प्रस्तावावर चर्चेसाठी रशियाची तयारीयुध्दबंदीच्या प्रयत्नांसाठी डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्लादिमिर पुतीन यांनी मानले आभार.
Pune Live: पुण्यातील नऱ्हे भागात राडा घालणाऱ्या तरुणांची काढली धिंडपुण्यातील नऱ्हे आंबेगाव परिसरात दहशत माजवत राडा घालणाऱ्या विशाल राऊत, समीर मारणे, ऋषिकेश लोके यासह इतर आरोपींची आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने आणि त्यांच्या पथकाने धिंड काढली. भारती विद्यापीठ आंबेगाव नऱ्हे भागात या गुंडाची दहशत असलेल्या परिसरात पोलिसांनी गुडघ्यावर चालवत धिंड काढली. या टोळक्याने परिसरातील गाड्यांची तोडफोड करणे नागरिकांना मारहाण करणे, यासह परिसरात दहशत माजवली होती. पोलिसांनी यांची दहशत मोडीत काढली आहे.
Sharad Pawar Live: जयंत पाटलांनी घेतली शरद पवारांची भेटमागच्या काही दिवसांपासून भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा असलेले जयंत पाटील यांनी शुक्रवारी शरद पवारांची भेट घेतली आहे. ही राजकीय भेट असल्याचं बोललं जातंय.
Satish Bhosale Live: खोक्या भोसलेची झाली वैद्यकीय चाचणीसतीश भोसले उर्फ खोक्या याची वैद्यकीय चाचणी झाली असून त्याला शिरुरच्या कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे. परवा प्रयागराज येथून अटक केल्यानंतर खोक्याला शुक्रवारी बीडमध्ये आणण्यात आलेलं होतं.
शिरुर पोलिस ठाण्यात खोक्या भोसलेवर तीन गुन्हेबीडच्या शिरुर कासार पोलिस ठाण्यामध्ये सतीश भोसले उर्फ खोक्यावर तीन गुन्हे दाखल आहेत. त्याला शुक्रवारी पोलिसांनी बीडमध्ये आणलं.
IPL Live: अक्षर पटेल दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधारदिल्ली कॅपिटल्सच्या संघाने आगामी इंडियन प्रीमियर लीग (IPL) हंगामासाठी अक्षर पटेलला कर्णधारपद सोपवले आहे. अनुभवी अष्टपैलू खेळाडू असलेल्या अक्षरने गेल्या काही वर्षांत दिल्लीसाठी शानदार कामगिरी केली असून, त्याच्या नेतृत्वाखाली संघाला नव्या उंचीवर नेण्याची अपेक्षा आहे. ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत त्याने संघाची धुरा स्वीकारली असून, त्याच्या कणखर खेळ शैलीमुळे संघ अधिक मजबूत होईल, असा विश्वास कॅपिटल्स व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.
Mumbai Live: मुंबईत अनेक ठिकाणी चिकन-मटन शॉपच्या बाहेर अर्ध्या किलोमीटरपर्यंतच्या रांगाआज धुळवळीचा दिवस त्यात शुक्रवार आल्यामुळे चिकन आणि मटणावर ताव मारणाऱ्या खवय्याने चिकन मटन शॉप च्या बाहेर रांगा लावल्या आहेत. मुंबई आणि उपनगरात अनेक ठिकाणी चिकन मटन शॉप च्या बाहेर अर्ध्या किलोमीटरपर्यंतच्या रांगा लागल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे ग्राहकांची वाढलेली संख्या पाहता सध्या मटणाचा भाव 780 रुपये किलो झाला आहे तरी देखील नागरिक रांगा लावून मटण खरेदी करताना दिसून येत आहेत.
Pune Live: पुण्यात धुळवडीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्तधुळवडीच्या निमित्ताने पुणे शहरात आज सकाळी ११ वाजल्यापासून रात्री १.३० पर्यंत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मद्यप्राशन करून गाडी चालवणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई केली जाणार असून, शहरातील विविध चौकांमध्ये ८० हून अधिक पोलिस पथके तैनात केली जातील. डीजे आणि डॉल्बीच्या तालावर थिरकणाऱ्या तरुणांवरही पोलिसांची करडी नजर राहणार आहे. शहरभरात होळी आणि धुळवडीचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत, मात्र कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून वाहतूक पोलिस आणि स्थानिक पोलिसांकडून सतर्कता बाळगली जाणार आहे.
Vladimir Putin LIVE : रशिया-युक्रेन युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचा अमेरिकेच्या 'त्या' प्रस्तावाला तत्वतः पाठिंबा, पण..रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी गुरुवारी सांगितले, की रशियाने युक्रेनमध्ये युद्धबंदीच्या अमेरिकेच्या प्रस्तावाला तत्वतः पाठिंबा दिला आहे. परंतु, त्यांनी अनेक स्पष्टीकरणे आणि अटी मागितल्या आहेत. ज्यामुळे लढाई लवकर संपण्याची शक्यता नाकारता येत नाही,” असे रॉयटर्सने वृत्त दिले आहे.
जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा साखरपुडा १० एप्रिलला होणार असल्याची माहिती आहे. साखरपुड्याचे निमंत्रण भावी वधू-वरांनी शरद पवार यांना दिले आहे. ऋतुजा पाटील या फलटणच्या असून फलटणचे प्रवीण पाटील यांच्या त्या कन्या आहेत.
Pune Metro Service LIVE : आज सकाळी ६ ते दुपारी ३ पर्यंत पुणे मेट्रो सेवा राहणार बंद; धुळवडनिमित्त मेट्रोच्या वेळापत्रकात बदलधुळवड सणानिमित्त पुणे मेट्रोची प्रवासी सेवा सकाळी ६ ते दुपारी ३ पर्यंत बंद राहणार आहे. दुपारी ३ ते रात्री ११ पर्यंत पुणे मेट्रोची सेवा नियमित सुरू राहणार आहे. पुणे मेट्रो रेलने याबाबत प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे.
Holi Festival LIVE : सूर्य उगवण्याआधीच बंजारा समाज बांधवांकडून होळीचे दहननांदेड : नांदेड शहरापासून जवळच असलेल्या रामेश्वर तांडा येथे आज शुक्रवारी (ता. १४) सूर्य उगवण्याआधी बंजारा समाजाच्या बांधवांनी होळी दहन केले. पारंपरिक होळी म्हणजे तांड्यावरील महिला, पुरुष, लहान बालके यांच्यासाठी एक पर्वणीच आहे. या उत्सवात मोठ्या प्रमाणात सहभागी होत पारंपरिक उत्सवाचा बांधवांनी आनंद घेतला.
Nagpur District Bank LIVE : नागपूर जिल्हा बँकेवर राज्य बँक प्रशासक नियुक्तमुंबई : तोट्यात असलेल्या नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर राज्य शासनाने, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची बँकेवर प्राधिकृत अधिकारी (संस्थात्मक प्रशासक) म्हणून नियुक्ती केली आहे. सहकार क्षेत्राच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारे बँकेवर संस्थात्मक प्रशासक नियुक्त झाल्याचे सांगितले जात आहे.
Dhayari Fire LIVE : धायरीत कचरा प्रकल्पाला भीषण आग; पंधराहून अधिक अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखलपहाटे अडीच ते तीनच्या सुमारास धायरी येथील पारी कंपनी जवळील कचरा प्रकल्पाला भीषण आग लागली असून पंधराहून अधिक अग्निशमन दलाचे बंब बोलवण्यात आले आहेत.
Kerala Red Alert LIVE : अतिनील किरणोत्सर्गामुळे केरळमध्ये 'रेड अलर्ट'तिरुअनंतपुरम : केरळ राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (केएसडीएमए) गुरुवारी केरळच्या पलक्कड जिल्ह्यात अतिनील किरणोत्सर्गाचे उच्च प्रमाण आढळल्यानंतर रेड अलर्ट जाहीर केला.
Belgaum-Nagpur Flight LIVE : बेळगाव-नागपूर विमानसेवा होणार बंदLatest Marathi Live Updates 14 March 2025 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासीयांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा आनंदाचा सण प्रत्येकाच्या आयुष्यात नवीन उत्साह आणि ऊर्जा निर्माण करो, असं त्यांनी म्हटलंय. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलच्या किमतीत झालेली घट, देशांतर्गत चलनवाढ व औद्योगिक विकासाबाबत जाहीर झालेल्या सकारात्मक आकडेवारीनंतर आज डॉलरच्या तुलनेत रुपयाची सुधारणा झाली आहे. रुपया २७ पैशांनी वधारला. तसेच उत्तम प्रतिसाद असूनही बेळगाव ते नागपूर दरम्यानची विमानसेवा १५ एप्रिलपासून बंद होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार आणि तमिळनाडू सरकार यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून भाषेच्या मुद्द्यावरून जोरदार वाद सुरू आहे. त्याचा आणखी भडका उडाला. तमिळनाडू सरकारने राज्याच्या २०२५-२६ च्या अर्थसंकल्प सादर करण्याच्या कागदपत्रात रुपयाच्या ₹ या चिन्हाऐवजी तमिळ भाषेतील ‘रुबई’ (तमिळमध्ये रुपये) चे नवे चिन्ह वापरले आहे. मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी घेतलेल्या निर्णयामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. तर, लाडक्या बहिणींच्या निधीसाठी समाज कल्याण विभागाचे ७ हजार कोटी वळवल्याचा आरोप केला जात आहे. त्याचबरोबर राज्यातील वातावरणात आता बदल पहायला मिळत आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..