WPL 2025 : या दोन खेळाडूंना अंतिम फेरीत इतिहास रचण्याची संधी, जाणून घ्या सविस्तर
GH News March 14, 2025 11:11 PM

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेचा अंतिम सामना 15 मार्चला मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स हे संघ आमनेसामने असतील. दिल्ली कॅपिटल्स सलग तिसऱ्या वर्षी अंतिम फेरीत स्थान मिळवण्यात यशस्वी ठरली आहे. तर मुंबई इंडियन्सने एलिमिनेटर फेरीत गुजरात जायंट्सचा पराभव केला आणि अंतिम फेरी गाठली आहे. मुंबईने दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. तसेच हे दोन्ही संघ दुसऱ्यांचा अंतिम फेरीत एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. यापूर्वी पहिल्या पर्वात मुंबई इंडियन्सने दिल्लीचा पराभव करत जेतेपदावर नाव कोरलं होतं. असं असताना या सामन्यात दोन खेळाडूंना इतिहास रचण्याची संधी आहे. एक खेळाडू दिल्ली कॅपिटल्स, तर दुसरा खेळाडू मुंबई इंडियन्सचा आहे. मुंबई इंडियन्सची अष्टपैलू नॅट स्कायव्हर ब्रंटने या सामन्यात तीन धावा करताच वुमन्स प्रीमियर लीगमध्ये 1000 धावा करणारी फलंदाज ठरेल. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेग लेनिंगलाही अशीच संधी आहे.

मेग लेनिंग चांगल्या फॉर्मात आहे. तिला वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत 1000 धावा करण्यासाठी 61 धावांची गरज आहे. तिने आतापर्यंत या स्पर्धेत 939 धावा केल्या आहेत. आता दोघांपैकी या स्पर्धेत हजार धावांचा पल्ला गाठण्याचा मान कोण मिळवतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. मेग लेनिंगने आतापर्यंत खेळलेल्या 26 डावात 40.82 च्या सरासरीने 939 धावा केल्या आहेत. यात तिने 9 अर्धशतकं झळकावली आहेत. तिची सर्वोच्च धावसंख्या ही 92 असून गुजरात जायंट्सविरुद्ध केली आहे.

दोन्ही संघांचे खेळाडू

दिल्ली कॅपिटल्स महिला संघ: मेग लेनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, जेस जोनासेन, जेमिमाह रॉड्रिग्स, ॲनाबेल सदरलँड, मारिझान कॅप, सारा ब्राइस (विकेटकीपर), निकी प्रसाद, मिन्नू मणी, शिखा पांडे, तीतास साधू, राधा यादव, अरुंधती रेड्डी, ॲलिस भाशे, नन्हा कापी, नन्हा कॅप्सी, अरुंधती रेड्डी, नल्लापुरेड्डी चरणी.

मुंबई इंडियन्स महिला संघ: यास्तिका भाटिया (विकेटकीपर), हेली मॅथ्यूज, नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), सजीवन सजना, अमेलिया केर, अमनजोत कौर, जी कमलिनी, संस्कृती गुप्ता, शबनीम इस्माईल, सायका इशाक, क्लोइन डेक्ट्रीन, क्लोए नॅक्ट्रीन, केलर, जिंतीमणी कलिता, पारुनिका सिसोदिया, अमनदीप कौर, अक्षिता माहेश्वरी

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.