देशभरात होळीचा उत्सव पाहायला मिळत असून राजकीय नेत्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण होळीच्या रंगात न्हाऊन निघाल्याचं पाहायला मिळालं. योगगुरू बाबा रामदेव (बाबा रामदेव) यांनीही आपल्या अनुयायांसह आणि पतंजलीतील सहकाऱ्यांसमवेत होळीचा आनंद घेतला. देवभूमी उत्तराखंडच्या हरीद्वार येथील पटांजली (पतंजली) विश्व विद्यालयात बाबा रामदेव यांच्यासमवेत सर्वांनी होळीच्या रंगांची उधळण केली. बाबा रामदेव यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘होलीकोत्सव यज्ञ एवं फूलों की होली’ या कार्यक्रमाचे आयोजन विद्यापाठीत करण्यात आले होते. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलपती बाबा रामदेव आणि कुलगुरू आचार्य बाळकृष्ण यांची विशेष उपस्थिती होती. बाबा रामदेव यांनी देशवासियांना होळीच्या आणि वसंत नवषष्टीच्या शुभेच्छा दिल्या. योग आणि यज्ञ हे आपल्या सनातन संस्कृतीचे जीवन तत्व असल्याचं बाबा रामदेव यांनी यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना म्हटलं.
होलिकोत्सव कार्यक्रमाला संबोधित करताना बाबा रामदेव म्हणाले की, होळी हा केवळ रंगांची उधळण करण्याचा उत्सव नसून सामाजिक समरसता, प्रेम, बंधुभाव, आणि असत्यावर सत्याचा, अनितीवर नितीचा, वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतिक आहे. आपण सर्वांनी होळीच्या पवित्र दिनी प्रण घेतला पाहिजे की, आपल्यामध्ये आत्मग्लानी, आत्मविस्मृती, आत्मसंमोहन हे गुण अंगीकृत व्हावेत. सदासर्वदा आपण सत्याची बाजू घेऊन, सत्याच्या मार्गावर, सनातन धर्माच्या मार्गावर, वेद मार्गावर, ऋषी मार्गावर, सात्विकतेच्या मार्गावर पुढे चाललं पाहिजे. नवीन ध्येय गाठली पाहिजे, असे बाबा रामदेव यांनी म्हटलं.
पुढे बोलताना बाबा म्हणाले की, सनातन संस्कृतीचा प्रत्येक पर्व आपण योग आणि यज्ञासह साजरा करतो. योग आणि यज्ञ हे आपल्या सनातन संस्कृतीचा जीवन तत्व, प्राण तत्व, साधारण तत्व आहे. या पवित्र दिनी स्वत:ला किंवा मित्रांनाही दारु व भांग पिऊन नशेच्या आहारी जाऊ देऊ नये, असे आवाहनही बाबा रामदेव यांनी देशवासियांना केले. समाजासाठी ते हानिकारक असल्याचेही त्यांनी म्हटले.
होलिकोत्सोवच्या कार्यक्रमप्रसंगी आयार्य बालकृष्ण यांनी देखील उपस्थितांशी संवाद साधला. आचार्य म्हणाले की, होळी हा गर्व, अहंकाराचा त्याग करण्याचं पर्व आहे. आपल्याती विकारी, विकृतरुपी हिरण्यकश्यपला होळीच्या अग्नीत दहन करण्याचे हे पर्व आहे. होळीच्या पवित्र रंगात, उत्सवात आपल्यातील मतभेद विसरुन, बंधुप्रेमाच्या रंगात रंगून हा उत्सव सार्थक बनवला पाहिजे. होळीचा उत्सव पूर्णपणे सात्विकतेत साजरा करावा, होळीच्या रंगोत्सवात शेण, चिखल आणि केमिकलयुक्त रंगाचा वापर करू नये, असे आवाहन देखील आचार्य बालकृष्ण यांनी केले. फूलं आणि हर्बल गुलालांची उधळण करुन होळीचा उत्सव साजरा करावा. कारण, केमिकलयुक्त रंगांमुळे डोळे आणि त्वचेला इजा होण्याची शक्यता असते, असेही आवाहन बालकृष्ण यांनी केले आहे.
रंगांची होळी खेळताना काही सावधानता बाळगली पाहिजे, त्यानुसार शरिराच्या उघड्या भागांवर मोहरीचं किंवा नारळाचं तेल लावलं पाहिजे. कोल्ड क्रीमरचाही वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे, केमिकलयुक्त रंगांचा वापर झाल्यास त्यापासून त्वचा खराब होण्याचा धोका कमी असतो, असेही बालकृष्ण यांनी सांगितले. दरम्यान, याप्रसंगी पतंजली विश्वविद्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी, पतंजली संस्थेतील सर्व शिक्षक, वर्गप्रमुख, प्राचार्य, अनुयायी उपस्थित होते. या सर्वांसह होलिकोत्सव आनंदात साजरा झाला.
शिर्डीत भाविकांची लूट करणाऱ्या दुकानादारांवर कारवाई; तीन दुकाने सील, मंत्री विखे पाटीलही बोलले
अधिक पाहा..