मुंबईत अदानी समुहाला मिळाला आणखी ३६००० कोटींचा प्रकल्प; म्हाडाअंतर्गत गृहनिर्माण पुनर्विकास करणार
ET Marathi March 15, 2025 06:45 PM
Adani Group News : अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या कंपनीने मुंबईतील एका मोठ्या प्रकल्पाची बोली जिंकली असून हा प्रकल्प ३६,००० कोटी रुपयांचा आहे. हा मुंबईतील सर्वात मोठ्या गृहनिर्माण विकास प्रकल्पांपैकी एक असून तो अदानी प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड द्वारे पूर्ण केला जाईल. अदानी प्रॉपर्टीजची सर्वाधिक बोलीअदानी ग्रुपची कंपनी अदानी प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड मुंबईतील गोरेगाव पश्चिम येथील मोतीलाल नगर I, II, III येथे १४३ एकर जागेवर पसरलेल्या गृहनिर्माण प्रकल्पात सहभागी आहे. ३६,००० कोटी रुपयांच्या पुनर्विकास प्रकल्पासाठी अदानी प्रॉपर्टीज (APPL) सर्वाधिक बोली लावणारी कंपनी ठरली, ज्याने ३.९७ लाख चौरस मीटरचे बिल्ट-अप क्षेत्रफळ दिले. बोली जिंकल्यानंतर, वाटप पत्र (LoA) लवकरच जारी केले जाण्याची अपेक्षा आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दिली परवानगीगेल्या आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाला (MHADA) बांधकाम आणि विकास संस्थेमार्फत (सी अँड डीए) मोतीलाल नगर विकसित करण्याची परवानगी दिली. यानंतर, राज्य सरकारने हा एक विशेष प्रकल्प घोषित केला आहे, जो म्हाडाच्या नियंत्रणाखाली आहे ( काम एजन्सीमार्फत होणार). या प्रकल्पांतर्गत, ३,३७२ निवासी युनिट्स, ३२८ पात्र व्यावसायिक युनिट्स आणि १,६०० पात्र झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन केले जाईल आणि बेकायदेशीर बांधकामे हटवली जातील. अदानी समूहाची दुसरी मोठी पुनर्विकास योजनामुंबईतील मोतीलाल नगर येथील ३६,००० कोटी रुपयांच्या पुनर्विकास प्रकल्पासाठी अदानी समूह सर्वाधिक बोली लावणारा ठरला, जो धारावी पुनर्विकास प्रकल्पानंतरचा दुसरा सर्वात मोठा प्रकल्प आहे.भारतीय अब्जाधीश गौतम अदानी यांनी मुंबईतील धारावी झोपडपट्टीचा प्रकल्प ५३०३ कोटींची बोली लावून जिंकला होता आणि तसेच अदानी प्रॉपर्टीज ही नवीन कंपनी स्थापन केली होती. आता या कंपनीने दुसरी मोठी बोली जिंकली आहे. उबाठा गटाने उपस्थित केले प्रश्नअदानी ग्रुपला पुनर्विकास प्रकल्प मिळाल्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे यांनीही प्रकल्पात पारदर्शकता असली पाहिजे, जर काही कमतरता असेल तर आम्ही तो मुद्दा उपस्थित करू असे म्हटले आहे.
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.