वुमन्स प्रीमियर लीग 2025 स्पर्धा अर्थात तिसऱ्या पर्वाचा निकाल आता पुढच्या 20 षटकात लागणार आहे. नाणेफेकीचा कौल दिल्ली कॅपिटल्सच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्सच्या मनाविरुद्ध निकाल लागला होता. तरी हरमनप्रीत कौरने मागच्या पाच सामन्यांचा उल्लेख करत सामना जिंकू असा विश्वास व्यक्त केला. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सला सुरुवातीला दोन धक्के बसले. यास्तिका भाटिया आणि हिली मॅथ्यूज स्वस्तात बाद झाले. हिली मॅथ्यूजने फक्त 3 धावा केल्या आणि केपच्या गोलंदाजी त्रिफळाचीत होत तंबूत परतली. त्यानंतर यास्तिका भाटीयाही काही खास करू शकली नाही. 8 धावांवर असताना केपच्या गोलंदाजीवर जेमिमा रॉड्रिग्सने तिचा झेल पकडत तंबूत धाडलं. मुंबई इंडियन्सने 20 षटकात 7 गडी गमवून 149 धावा केल्या आणि विजयासाठी 150 धावांचं आव्हान दिलं आहे. आता हे आव्हान दिल्ली पूर्ण करणार की मुंबई रोखणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
नॅट स्कायव्हर ब्रंट आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी जबरदस्त खेळी केली. तिसऱ्या विकेटसाठी 89 धावांची भागीदारी केली. पण 39 धावांवर असताना ब्रंटची विकेट पडली आणि धावसंख्येच्या गतीवर परिणाम झाला. त्यानंतर आलेली एमेलिया केर 2 धावा करून बाद झाली. तर दडपणात असलेली सजीवन संजना आपलं खातंही खोलू शकली नाही. दुसऱ्या बाजूने हरमनप्रीत कौरने कर्णधारपदाला साजेशी कामगिरी केली. 44 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 66 धावा करून बाद झाली.
मुंबई इंडियन्स महिला (प्लेइंग इलेव्हन): यास्तिका भाटिया (विकेटकीपर), हेली मॅथ्यूज, नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), सजीव सजाना, अमेलिया केर, अमनजोत कौर, जी कमलिनी, संस्कृती गुप्ता, शबनीम इस्माईल, सायका इशाक.
दिल्ली कॅपिटल्स महिला (प्लेइंग इलेव्हन): मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, जेस जोनासेन, जेमिमाह रॉड्रिग्स, ॲनाबेल सदरलँड, मारिझान कॅप, सारा ब्राइस (विकेटकीपर), निकी प्रसाद, मिन्नू मणी, शिखा पांडे, नल्लापुरेड्डी चरणी.