कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कोकाटे यांच्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी १८ मार्च रोजी उच्च न्यायालयामध्ये पहिली सुनावणी होणार आहे. माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात सतीश वाणी या वकील तथा माजी न्यायाधीशांनी याचिका दाखल केली आहे.
सतीश वाणी यांनी माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात याचिका दाखल केली. त्यांनी न्यायालयाने कोकाटेंच्या शिक्षेवर स्थगिती दिल्यावर आक्षेप घेत ही याचिका दाखल केली. त्यांनी सांगितले की, 'वाईट लोकांची वाईट खेळी आहे. घाई गर्दीत कोकाटे यांचा निकाल दिला आहे. इतर लोकांना बाजू मांडू दिली नाही. सुनील केदार यांच्याबाबत फडके मॅडमने सांगितले होते. गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. एकीकडे खोटं सांगून सदनिका घेतात. दुसरीकडे ३० लाख वाटायला लागतात त्यासाठी बंदूक लायसन्स मागितले.'
सतीश वाणी यांनी पुढे सांगितले की, 'कोकाटे यांना शिक्षा दिली आहे तर त्याला स्थगिती कशी दिली.' असा सवाल सतीश वाणी यांनी उपस्थित केला आहे. 'दंड तर भरलेला आहेच ना? कारवाई व्हायला पाहिजे होती. लिली थॉमसन यांच्याप्रमाणे राज्यपाल कारवाई करणार की नाही. मी स्वतः राज्यपाल यांच्याकडे पत्रव्यवहार करणार आहे. कोकाटे यांचे गोव्याला हॉटेल आहेत. ३० लाख महिन्याला वाटतात.'
तसचं, 'आम्ही निकालाच्या विरोधात उच्च न्यायालयात गेलोय. चुकीचा निर्णय दिला आहे. न्यायालयाने दिलेल्या निकालाशी आम्ही सहमत नाही. सुनील केदार प्रकरणात २१ प्रकरणाचे निर्णय आहे. २ वर्षापेक्षा जास्त शिक्षा असेल त्यांना आमदारकीला उभं करू नये असे फाळके मॅडमने म्हटलं आहे. ज्यांनी निकाल दिला अशा न्यायाधीशाने समाजकार्य करावे. कशाला पगार घेऊन काम करतात. लोक स्टँडी नाही असे आम्हाला सांगितले होते.', असं देखील त्यांनी सांगितले.