Maharashtra Politics: औरंगजेबाच्या थडग्यावर जाऊन फुलं उधळण्याची गरज काय? भाजप नेताचा विरोधकांना संतप्त सवाल
Saam TV March 16, 2025 12:45 AM

छत्रपती संभाजीनगरमधील खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी केली जात आहे. दुसरीकडे औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून भाजप नेता संतप्त झाला अशून त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. 'औरंगजेबाच्या थडग्यावर जाऊन फुलं उधळण्याची गरज काय?', असा सवाल भाजप नेते अतुल भातखलकर यांनी उपस्थित केला आहे.

अतुल भातखळकरयांनी विरोधकांवर टीका करताना सांगितले की, 'मुद्दा हा आहे औरंगजेबाची कबर सजवण्याची आवश्यकता काय आहे? औरंगजेबाच्या थडग्यावर जाऊन विरोधकांना फुल उधळण्याची आवश्यकता काय आहे? यांना केवळ औरंगजेबाचा थडगा सजवून मुस्लिम पुष्टीकरण करण्याची गरज आहे.'

तसंच, 'मी विरोधकांना एवढाच इशारा देईन छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास लपवण्याचे पाप तुम्ही इतकी वर्षे केले आहे. आज हिंदू समाज जागृत झालेला आहे यापुढे औरंगजेबाचे थडगं वाचवण्याचा जास्ती प्रयत्न केला तर हिंदू समाज त्या औरंगजेबाच्या थडग्यात तुम्हाला पुरल्या शिवाय राहणार नाही हे विरोधकांनी लक्षात ठेवावे.', असा इशारा अतुल भातखळकर यांनी दिला आहे.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा वाढवण्यात आल. होळी, धुलीवंदन आणि रमजान महिना सुरू असल्याने सुरक्षा वाढवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. एसआरपीएफचे काही जवान, स्थानिक पोलिसांकडून सुरक्षा वाढवली.

गेल्या दोन आठवड्यांपासून सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याची मागणी केल्यावरून वातावरण तापले आहे. मिलिंद एकबोटे यांनी पुढील २० दिवस छत्रपती संभाजीनगर जिल्हा बंदी घालण्यात आली आहे. पोलिसांनी जिल्हा प्रशासनाने हे आदेश दिले आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.