धारावीत होळीचा सण उत्साहात
धारावी, ता. १५ (बातमीदार) : धारावीतील अनेक वस्त्यांमध्ये गल्लोगल्ली होळी पेटवण्यात आली. धारावी कोळीवाड्यातील प्रसिद्ध होळी मैदानात मानाची होळी पेटवण्यात आली. होळीभोवती महिलांसह पारंपरिक वेशभूषा करून फेर धरला.
धारावीतील संत रोहिदास समाजबांधवांसह भगिनींनी होलिकोत्सव साजरा केला. महिलांचा हळदी-कुंकू समारंभ पार पडला. या वेळी पाच जणांना समाजरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला. यात दिवंगत किसन जानू गवाणकर, दिवंगत तुकाराम जानू गव्हाणकर, दिवंगत तुळशीराम विठ्ठल भोईर, दिवंगत दशरथ लक्ष्मण खरूणकर, दिवंगत महादेव सखाराम मोहोकर यांच्या कुटुंबीयांना गौरवण्यात आले. तर सायबर गुन्हे याबद्दल सतर्कता व महिला अधिकार याबद्दल धारावी पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक संगीता माने यांनी सविस्तर माहिती दिली.