राज्यात तापमानात प्रचंड वाढ झाली असून विदर्भात उन्हाचा प्रचंड कडाका आहे. हवामान खात्यानेही विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय.
Beed : खोक्यानंतर आणखी एकामुळे सुरेश धस अडचणीतसतीश भोसले उर्फ खोक्यानंतर आता आणखी एका कार्यकर्त्यामुळे सुरेश धस अडचणीत आले आहेत. आशिष विशाळ असं त्याचं नाव असून संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांना मदतीच्या नावाखाली अधिकाऱ्यांकडून पैसे गोळा केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. दरम्यान, सुरेश धस यांनी हा आपला कार्यकर्ता नसल्याचं म्हटलंय.
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदच्या पुतण्याची हत्यापाकिस्तानात लष्कर ए तय्यबाच्या मोस्ट वाँटेड दहशतवाद्याची हत्या करण्यात आलीय. हाफिज सईदचा तो पुतण्या होता. त्याच्यासोबत असलेली एक व्यक्ती जखमी झाली असून ती हाफिज सईद असल्याचा दावा केला जात आहे.