Dividend Stocks : 3 कंपन्यांनी लाभांश जाहीर केला, रेकॉर्ड तारीखही केली निश्चित
ET Marathi March 16, 2025 04:45 PM
मुंबई : शेअर बाजारातील अनेक कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांना लाभांशाची भेट देत आहेत. गुंतवणूकदारांसाठी लाभांश हा अतिरिक्त कमाईचा मार्ग आहे. आता 13 मार्चला तीन कंपन्यांनी लाभांश देण्याची घोषणा केली आहे. या लाभांशाची रेकॉर्ड तारीखही जाहीर करण्यात आली आहे. 1) मिश्रा धातू निगम लिमिटेड (Mishra Dhatu Nigam Ltd)कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 19 मार्चला निश्चित करण्यात आली आहे. या बैठकीत गुंतवणूकदारांना लाभांश देण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यात येईल. लाभांशांसाठी 25 मार्च 2025 ही रेकॉर्ड तारीख निश्चित करण्यात आली आहे. कंपनीने शेवटचा एक्स-डिव्हिडंड मार्च 2024 मध्ये ट्रेड केला होता. तेव्हा कंपनीने एका शेअरवर 1.41 रुपये लाभांश दिला होता. गुरुवारी कंपनीचे शेअर्स 2.08 टक्क्यांच्या वाढीसह 270.40 रुपयांच्या पातळीवर बंद झाले. 2) रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (RailTel Corporation of india Ltd)या रेल्वे शेअर्सनेही लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने एका शेअरवर 1 रुपये लाभांश जाहीर केला आहे. यासाठी 2 एप्रिल ही रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित केली आहे. गुरुवारी कंपनीचे शेअर्स 2.25 टक्क्यांच्या घसरणीनंतर 282.70 रुपयांच्या पातळीवर बंद झाले. 3) पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन (Power Finance Corporation Ltd)सरकारी कंपनी पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनने एका शेअरवर 3.50 रुपये लाभांश देण्याचा निर्णय घेतलाआहे. लाभांशाची रेकॉर्ड तारी 19 मार्च निश्चित करण्यात आली आहे. गुरुवारी कंपनीचे शेअर्स 1.95 टक्क्यांच्या घसरणीनंतर 388.10 रुपयांच्या पातळीवर बंद झाले. यापूर्वी, कंपनीच्या शेअर्सने 28 फेब्रुवारी रोजी एक्स-डिव्हिडंड व्यवहार केला होता. यावेळी 3.50 रुपये लाभांश देण्यात आला.
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.