पराग ढोबळे
Nagpur Violence News : औरंगजेबाच्या कबरीवरुन (Aurangzeb Toomb) पेटलेल्या वादामुळे सोमवारी संध्याकाळी हिंसक वळण घेतलं. (Nagpur News) दोन गटांमध्ये दगडफेक झाली, त्याचे पडसाद मंगळवारी विधानसभेतही उमटले. दोन गटामध्ये राडा सुरू असतानाच अंधाराचा फायदा घेत महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एकीकडे दंगल सुरू असतानाच काही समाजकंटकांनी महिलेवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. माणुसकी शिल्लक आहे की नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
सोमवारी रात्री दंगल घडली होती, शहरातील काही भागात तणावाचे वातावरण होते. याच वेळी अंधाराचा फायदा घेत महिलेचा विनयभंग करण्यात करण्यात आल्याची दुर्दैवी घटना समोर आली. एकीकडे भावना दुखावल्या म्हणून आक्रोश सुरू असताना मात्र दुसरीकडे कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यावर अशा पद्धतीचा हल्ला करणे हे काळी फासणारे आहे.
नागपूर मध्ये मध्ये सोमवारी रात्री दंगल फडकली. त्यावेळी कर्तव्यावर असणाऱ्या महिला पोलिसाची वर्दी खेचण्याचा प्रयत्न जमावाने केल्याची घटना घडली. याप्रकरणी गणेश पेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. भावना दुखावल्या म्हणून आक्रोश सुरू असतानाच महिला पोलिसाला विवस्त्र करण्याचा प्रयत्न झाला. दरम्यान, सोमवारी रात्री झालेल्या दंगली दरम्यानचे अनेक व्हिडिओ समोर आले आहे. त्यामध्ये अश्लील शिवीगाळ दिसून येते.
दरम्यान, कीर्ती क्षीरसागर नावाची महिला केयरटेकरचे काम करते. तिलाही या जमावाने कशा पद्धतीने मारहाण केली याची आपबीती त्या महिलेने साम टीव्हीशी बोलताना सांगितली. एकीकडे भावना दुखावल्या म्हणून आक्रोश करायचा अन् दुसरीकडे महिलांच्या अब्रूवर हात टाकायचा, यामुळे नागपूरमध्ये संतप्त भावना उमटत आहेत.