ऑस्ट्रेलियाच्या सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक असलेल्या पीटर सीडल याच्या कारकीर्दीचा शेवट झाला आहे. पीटर सीडल याने वाका येथील ऐतिहासिक मैदानात कारकीर्दीतील अखेरचा साना खेळला. पीटरने अखेरच्या सामन्यात वेस्टर्स ऑस्ट्रेलियाविरुद्ध 7 विकेट्स घेतल्या. पीटरने कारकीर्दीतील शेवटच्या बॉलवर विकेट घेतली आणि टीमला विजयी केलं. अशाप्रकारे पीटरच्या संघाचा 34 धावांनी विजय झाला. पीटर याला शेवटच्या सामन्यात सहकाऱ्यांनी ‘गार्ड ऑफ ऑनर’ दिला. तसेच पीटर टी 20 क्रिकेटमध्ये खेळणार असल्याचंही म्हटलं जात आहे. पीटर बिग बॅश लीग स्पर्धेतील आगामी हंगामात खेळू शकतो. पीटरने ऑस्ट्रेलियाचं 67 कसोटी, 20 एकदिवसीय आणि 2 टी 20i सामन्यांत प्रतिनिधित्व केलं आहे.
पीटरने 2008 साली टीम इंडियाविरुद्ध कसोटी पदार्पण केलं. टीम इंडियाने या सामन्यात ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला होका. मात्र पीटरने आपली छाप सोडली. पीटरने कसोटी पदार्पणात एकूण 4 विकेट्स घेतल्या. पीटर 2019 पर्यंत ऑस्ट्रेलियासाठी कसोटी क्रिकेट खेळला. पीटरने कसोटीत एकूण 221 विकेट्स घेतल्या. पीटरला कसोटीच्या तुलनेत फक्त 20 एकदिवसीय सामने खेळण्याचीच संधी मिळाली. पीटरने 20 एकदिवसीय सामन्यांत 17 विकेट्स घेतल्या. तसेच पीटरने 3 टी 20I विकेट्स घेतल्या.
पीटर सीडलकडून कारकीर्दीतील शेवटच्या बॉलवर विकेट
पीटरने आंतरराष्ट्रीय कारकीर्दीसह फर्स्ट क्लास क्रिकेटमध्येही धमाकेदार कामगिरी केली. पीटरने त्याच्या कारकीर्दीत एकूण 231 सामने खेळले. पीटरने 231 सामन्यांत 792 विकेट्स घेतल्या. पीटरने या दरम्यान 27 वेळा 5 विकेट्स घेतल्या. तसेच पीटरने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये बॅटिंगनेही आपली छाप सोडली. पीटरने 1 शतकासह फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 3 हजार 990 धावा केल्या. सोबतच पीटरने 86 लिस्ट ए सामन्यांत 111 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर 133 टी 20 सामन्यांत 153 विकेट्स मिळवल्या.