ता. 22 मार्चपासून IPL 2025 चा थरारक सिझन सुरू होणार आहे. या सिझनचा पहिला सामना RCB विरुद्ध KKR यांच्यात खेळला जाणार आहे.
यावर्षीचा लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंत असून या टीमचे मालक संजीव गोयंका आणि सगळ्या खेळाडूंनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली.
सीएम योगी आदित्यनाथांनी यावेळी सगळ्या खेळाडूंशी चर्चा केली आणि त्यांना खास गिफ्ट दिले.
सीएम योगींनी लखनऊ सुपर जायंट्स टीम्सच्या टी-शर्टचे अनावरण केले.
लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंत याला सीएम योगींनी खास गिफ्ट दिले. त्याचबरोबर टीमचे मालक आणि ऋषभ यांना क्रिकेटची बॅटही भेट म्हणून दिली.
सीएम योगींनी कर्णधार ऋषभ पंत याला श्रीरामांची पांढऱ्या रंगाची मुर्ती भेट म्हणून दिली.
टीमचे प्रशिक्षक झहीर खान यांनाही योगी आदित्यानाथांनी गिफ्ट देत IPL साठी शुभेच्छा दिल्या.
ऋषभ पंत यांने या खास गिफ्टचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत सीएम योगींचे आभार मानले.