आयपीएल 2025 स्पर्धेला 22 मार्चपासून सुरुवात होणार असून पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. पहिल्याच सामन्याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. असं असताना या स्पर्धेत भाग घेणाऱ्या फ्रेंचायझींना किती प्रवास करावा लागणार याचंही गणित मांडलं जात आहे. कारण स्पर्धेसाठी संघांना एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करावा लागतो. यात रजत पाटीदार नेतृत्व करत असलेल्या संघाला सर्वाधिक प्रवास करावा लागणार आहे. आयपीएल जेतेपदाचं स्वप्न उराशी बाळगून सर्वात जास्त प्रवास हा आरसीबीच्या वाटेला आहे. आयपीएल 2025 स्पर्धेत आरसीबीचा प्रवास इतका आहे की जगातील कोणात्या देशात पोहोचू शकते. त्यामुळे आरसीबीच्या वाटेला किती प्रवास आहे याची उत्सुकता वाढली असेल, तर जाणून घ्या आयपीएल 2025 स्पर्धेत आरसीबी किती प्रवास करणार ते…
भारत आणि अमेरिका यांच्यात 13500 किमी अंतर आहे. तर आयपीएल 2025 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु 17084 किमी प्रवास करणार आहे. त्यामुळे या स्पर्धेत सर्वाधिक प्रवास हा आरसीबीला करावा लागणार आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर ऋतुराज गायकवाड नेतृत्व करत असलेला चेन्नई सुप किंग्स संघ येतो. चेन्नईला या स्पर्धेत 16184 किमी प्रवास करावा लागणार आहे. पंजाब किंग्स 14341 किमी प्रवास, कोलकाता नाईट रायडर्स 13537 कमी प्रवास, राजस्थान रॉयल्स 12730 किमी, तर मुंबई इंडियन्सचा प्रवासही 12 हजार पेक्षा जास्त आहे. मुंबई इंडियन्सला 12702 किमी प्रवास करावा लागणार आहे.
आयपीएल 2025 स्पर्धेत सर्वात कमी प्रवास चार संघांच्या वाटेला आला आहे. गुजरात टायटन्स 10405 किमी प्रवास करेल. तर लखनौ सुपर जायंट्स 9747 किमी प्रवास, दिल्ली कॅपिटल्स 9270 किमी प्रवास करेल. तर सर्वात कमी प्रवास हा सनरायझर्स हैदराबादला करावा लागणार आहे. त्यांना या स्पर्धेत फक्त 8536 किमी अंतर कापायचं आहे. आयपीएलच्या साखळी फेरीत प्रत्येक संघाला 14 सामने खेळायचे आहेत. दुसरीकडे, अंतिम फेरी गाठणाऱ्या संघाला अजून प्रवास करावा लागणार आहे. त्यामुळे यात आणखी भर पडेल. आता स्पर्धेच्या शेवटी कोणाच्या वाटेला किती प्रवास आला हे स्पष्ट होईल.