आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वीच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या स्थितीबाबत चर्चा होताना दिसत आहे. कारण मागच्या पर्वात आरसीबीचा जेतेपदासाठी प्रयत्न सुरु आहे. पण पदरी निराशा पडत आहे. मेगा लिलावानंतर संघ बांधणी केली असून पुन्हा एकदा उभारी घेण्यासाठी आरसीबी संघ सज्ज आहे.पहिला सामना गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स आणि विराट कोहलीची टीम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. दोन्ही संघात तुल्यबल खेळाडू आहेत. त्यामुळे हा सामना कोण जिंकेल याबाबत सांगणं कठीण आहे. केकेआरमध्ये असे काही खेळाडू आहेत जे यावेळी आरसीबीसाठी डोकेदुखी ठरू शकतात. मागच्या दोन पर्वात कोलकात्याने पहिल्याच सामन्यात आरसीबीला पराभवाची धूळ चारली आहे. त्यामुळे या पर्वात विजय मिळवून विजयाची हॅटट्रीक करण्यासाठी उत्सुक आहेत. तर आरसीबी यावेळी स्पर्धेत विजयाने सुरुवात करण्यास इच्छुक आहे.
क्विंटन डी कॉक: दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक यावेळी केकेआरचा भाग आहे. मेगा लिलावात कोलकात्याने त्याच्या किंमत मोजली आणि संघात घेतलं. क्विंटन डी कॉकला आयपीएलचा दांडगा अनुभव आहे. यापूर्वी आरसीबीसाठी खेळला असून सलामी उतरला ठआहे.. डी कॉक हा एक उत्तम खेळाडू आहे. क्विंटन एकदा का क्रीजवर स्थिरावला की, नंतर सामना प्रतिस्पर्ध्याच्या हातून निसटू शकतो. त्यामुळे क्विंटन हा आरसीबीसाठी मोठं संकट ठरू शकतो.
सुनील नरीन : सुनील नरीन गेल्या काही वर्षांपासून केकेआरकडून खेळत आहे. मागच्या पर्वात संघाला विजेतेपद मिळवून देण्यात त्याचे योगदान महत्त्वाचे होते. केकेआरकडून सुनील नरीन डावाची सुरुवात करेल यात काही शंका नाही. मागच्या पर्वात त्याने आपली ताकद दाखवून दिली आहे. पॉवरप्लेमध्ये गोलंदाजांवर वर्चस्व गाजवतो आणि त्यांचं कंबरडं मोडण्याची ताकद ठेवतो. पॉवरप्लेमध्येच नरीन सामना हातून खेचून घेतो. तसेच फिरकीने फलंदाजांना एक कठीण आव्हान देखील देतो. सुनील नरीन पहिल्या सामन्यात आरसीबीसाठी खूप धोकादायक बनण्याची संधी आहे.
आंद्रे रसेल : आंद्रे रसेलसारखा आक्रमक फलंदाज सामना खेचून आणण्याची ताकद ठेवतो. रसेलने यापूर्वी शानदार खेळीच्या जोरावर केकेआरला अनेक सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे. इतकंच काय तर आयपीएलमध्ये अनेक वेळा आरसीबीविरुद्धही शानदार कामगिरी केली आहे. स्वतःच्या बळावर संघाला विजयाकडे नेण्याची क्षमता आहे. यावेळीही आरसीबीसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.