शहापुरात जागतिक ग्राहकदिन साजरा
esakal March 20, 2025 10:45 PM

किन्हवली (बातमीदार )ः शहापूर तहसीलदार कार्यालयातील पुरवठा शाखेच्या वतीने तलाठी सभागृहात जागतिक ग्राहकदिन साजरा करण्यात आला. या वेळी तालुक्यातील सर्वच रास्त धान्य दुकानदार उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी ग्राहक हक्क व संरक्षण याविषयी मार्गदर्शन केले. तसेच शिधावाटपात सुसूत्रता व पारदर्शकता यावी, म्हणून प्रत्येक रास्त भाव दुकानदाराने शिधापत्रिकेत समाविष्ट असलेल्या प्रत्येक लाभार्थ्याची ई पॉसमशीनद्वारे केवायसी करावी, असे आवाहन करण्यात आले. या वेळी व्यासपीठावर निवासी नायब तहसीलदार दत्तात्रय बांभळे, पुरवठा निरीक्षण अधिकारी डॉ. अमृता सूर्यवंशी, रास्त भाव दुकानदार संघटना अध्यक्ष किरण तूपे, सचिव घनश्याम गायकवाड, उपाध्यक्ष सचिन चौधरी उपस्थित होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.