धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील नारंगवाडी येथे हिंदू संघटनांकडून रास्ता रोको आंदोलन.
उमरगा - लातुर महामार्गावर नारंगवाडी पाटीजवळ रास्ता रोको आंदोलन.
औरंगजेबाचे स्टेटस ठेवल्यामुळे वाद पेटल्याची माहिती.
आरोपीला तात्काळ अटक करण्याची हिंदु संघटनांची मागणी.
आंदोलकांनी रस्तावर टायर जाळून केला निषेध.
आंदोलनस्थळी उमरगा पोलिस घटनास्थळी दाखल.
अंधेरीतील रबर प्लास्टीकच्या कंपनीला भीषण आगअंधेरी पूर्व एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग. न्यू नंदू इंडस्ट्रियल इस्टेट या रबर प्लास्टीकच्या कंपनीला आग. ५ ते ६ गाड्या अग्निशमनच्या गाड्या घटनास्थळी दाखल. आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू.
लातूर सोलापूर महामार्गावर बस आणि ट्रकचा भीषण अपघातलातूर सोलापूर महामार्गावरच्या औसा चौकात बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. अपघातात ६५ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू. अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. या अपघातात ६५ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे.
सह्याद्री साखर कारखान्यात बॉयलरचा स्फोट; टेस्टींग करताना घडली दुर्घटनाकराड तालुक्यातील यशवंतनगर येथील सह्याद्रि सहकारी साखर कारखान्यात ईएसपी बॉयलरचा टेस्टींग करताना स्फोट झाल्याची घटना आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत तीन कर्मचारी गंभीररित्या भाजल्याची माहिती मिळाली आहे. जखमींना तात्काळ उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Mumbai Crime: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची मोठी कारवाई, वांद्रे पश्चिम परिसरातून 286 किलो गांजा जप्तमुंबई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखने नवले येथे मोठी कारवाई केलीय. वांद्रे पश्चिम परिसरातून 286 किलो वजनाचा गांजा जप्त केला आहे. वांद्रे पश्चिम परिसरातील ट्रांजिस्टर येथील एका खोलीतून हा गांजा जप्त केला असून या गांजाची अंदाजे किंमत ७१,६७,०००/-रू. इतकी असून याप्रकरणी गुन्हे शाखा 9 ने आरोपी ईम्रान कमलुद्दीन अन्सारी याला अटक केली आहे. सध्या आरोपी गुन्हे शाखा नऊच्या ताब्यात असून आरोपीने हा गांजा कुठून आणला आणि तो कुणाला विकणार होता या संदर्भात पोलीस तपास करत आहेत.
ShivBhojan Thali: 'शिवभोजन' केंद्रातील जेवणात आढळल्या अळ्या, खामगावातील घटनाशिवभजन केंद्रातील जेवणामध्ये अळ्या आढळल्याचा किळसवाणा आणि धक्कादायक प्रकार बुलढाण्याच्या खामगावमध्ये समोर आला आहे. उपजिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात शिवभजन केंद्रामध्ये हा संपूर्ण प्रकार उघडकीस आलाय. नागरिकांनी घेतलेल्या जेवणामध्ये अक्षरशा कोळ्यांचा थर दिसून आल्याने शिवभोजन केंद्रामधून दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या दर्जेबाबत संताप व्यक्त केला जात आहे. अन्न व औषध प्रशासनाने तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
बिजापूरमध्ये सुरक्षा दलाची मोठी कारवाई, दंतेवाडा परिसरात २२ नक्षलवाद्यांचा खात्माछत्तीसगडमधील सुरक्षा दलाने मोठी कारवाई केलीय. सुरक्षा दलाने दंतेवाडा परिसरात २२ नक्षलवाद्यांचा खात्मा केलाय. गंगालूर पीएस लीमिटजवळील बिजापूर-दंतेवाडा सीमेवर सुरक्षा दलाने २२ नक्षलवाद्यांचा खात्मा केलाय.
Nagpur News - नागपुरात दोन पोलीस स्टेशन हद्दीतील संचारबंदी पूर्णतः उठवलीनागपूर -
- नागपुरात दोन पोलीस स्टेशन हद्दीतील संचारबंदी पूर्णतः उठवली
- तर काही भागात चार तास शिथिलता
- तर हिंसाचार झालेल्या भागातील पोलीस स्टेशनमध्ये संचारबंदी जैसे थे
Mumbai News: ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीरमहाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर
मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा
Amravati News: अमरावतीमध्ये बँक ऑफ महाराष्ट्राच्या कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलनअमरावतीमध्ये बँक ऑफ महाराष्ट्राच्या कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन
बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेमध्ये सफाई कर्मचाऱ्यांचे पद रद्द केले असून ते काम आऊटसोर्स च्या माध्यमातून होत असून त्यांना वेतन सुद्धा दिले जात नाही त्यामुळे कायमस्वरूपी पदे भरावी....
महाराष्ट्र बँकेत ग्राहकांची संख्या वाढली असताना कर्मचाऱ्यांची संख्या कमी होत चालल्याने ग्राहकांना याचा त्रास सहन करावा लागत असून तात्काळ कर्मचाऱ्यांची भरती करावी....
यासह विविध मागण्यांसाठी आज अमरावतीमध्ये बँकेच्या कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन दिले
Nagpur News: नागपूरातील ११ वस्त्यांपैकी काही भागातील संचारबंदी आज हटवण्याची शक्यता?- नागपूरातील ११ वस्त्यांपैकी काही भागातील काही तासासाठी संचारबंदी आज हटवण्याची शक्यता?
- नागपूर पोलीस आयुक्त कार्यालयात काही भागातील संचारबंदी हटवण्याबाबत होणार चर्चा
- थोड्याच वेळात पोलीस आयुक्त कार्यालयात सर्व पोलीस उपायुक्त आणि वरिष्ठ अधिकरी यांच्यशी चर्चा करणार आहे...
- यात टप्प्या टप्याने आढावा घेऊन परिस्थिती सामान्य करण्याचा प्रयत्न असणार आहे
- ज्या भागात फारसा तणाव नाही, त्या भागातील संचारबंदी आज हटवण्याची शक्यता
Kolhapur News: प्रशांत कोरटकरने मोबाईलमधील डाटा केला डिलीटकोल्हापूर -
प्रशांत कोरटकरने मोबाईलमधील डाटा डिलीट केला
त्यामुळे त्याच्यावर पुरावा नष्ट केल्याचं कलम लावा
इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांच्यासह शिवप्रेमींची मागणी
पुरावा नष्ट केल्याचं कलम वाढवण्याच्या मागणीसाठी इंग्रजीत सावंत यांच्यासह शिवप्रेमी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात
जुना राजवाडा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची घेणार भेट
प्रशांत कोरटकर चां जामीन फेटाळताना कोरटकर ने मोबाईल डाटा डिलीट केल्याचं न्यायालयाने नोंदवला आहे निरीक्षण
Pune News: माथाडी कायद्यातील प्रस्तावित दुरूस्ती रद्द करा, बाबा आढाव पुन्हा उपोषणाला बसलेवयाच्या ९६ व्या वर्षी सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांना पुण्यात पुन्हा एकदा रस्त्यावर उतरावे लागलं आहे.
निमित्त आहे माथाडी कायद्यातील प्रस्तावित दुरुस्ती रद्द करा, या मागणीचे.
पुण्यात याच मागणीसाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आलं होतं.
मार्केट यार्ड पासून मोर्चाला सुरुवात झाली आणि सर्किट हाऊस समोर कामगार आणि बाबा आढाव यांनी ठिय्या मांडला.
Raigad News: रायगडचे पालकमंत्री भरत गोगावलेच झाले पाहिजे, मंत्री संजय शिरसाठ यांची मागणीरायगड जिल्हा पालकमंत्रीपदाच्या मुद्द्याला पुन्हा एकदा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी फोडणी दिली भरत गोगावले हेच रायगड चे पालकमंत्री झाले पाहिजेत हिच शिवसेनेची मागणी असून मुख्यमंत्र्यांनी देखील तसा शब्द दिला असल्याचे शिरसाठ म्हणाले. अधिवेशन काळात गडबड नको म्हणून विषय थांबला असल्याचे स्पष्ट करत शिरसाठ यांनी शिवसेनेचा ठाम दावा असल्याचे सांगितल्याने आता पून्हा एकदा या मुद्द्यावरून शिवसेना राष्ट्रवादीत जुंपण्याची शक्यता निर्माण झाली आहे
Chandrapur News: चंद्रपूरमध्ये एसटी बस उलटली, 22 प्रवासी जखमीचंद्रपूरमध्ये एसटी बस उलटली, 22 प्रवासी जखमी
भरधाव वेगात असलेल्या महामंडळ बसचा अपघात होऊन सर्व 22 प्रवासी जखमी झाले.
हा अपघात चिमूर पिंपळनेरी महामार्गावर घडला.
चिमूरवरून नागपूरकडे जात असताना चालकाचे नियंत्रण सुटून ही बस उलटली.
Beed News: दारुसाठी पैसे दिले नाही म्हणून तरुणाला मारहाण, चौघांविरोधात गुन्हा दाखलबीड जिल्ह्यातील दस्तागीरवाडी येथील युवकाला हत्तीखाना परिसरात मारहाण
मारहाणीचा व्हिडिओ बनवला
मारहाणीच्या व्हायरल व्हिडिनंतर अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल
सर्व आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती
Pune News: केज तालुक्यातील 'त्या' शिक्षकाच्या कुटुंबाला सुप्रिया सुळे यांनी दिला कृतिशील आधारकेज तालुक्यातील 'त्या' शिक्षकाच्या कुटुंबाला सुप्रिया सुळे यांनी दिला कृतिशील आधार
दोन्ही मुलांचा शैक्षणिक खर्च उचलण्याबरोबरच मातेला रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न
केळगाव येथील आश्रमशाळेतील शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी आत्महत्या केली होती
Sambhajinagar News: भानुदास एकनाथ जयघोष आणि टाळ मृदंगाच्या गजरात दुमदुमली पैठण नगरीछत्रपती संभाजीनगर -
भानुदास एकनाथ जयघोष आणि टाळ मृदंगाच्या गजरात दुमदुमली पैठण नगरी.
नाथ षष्टी सोहळ्यानिमित शेकडो दिंड्या पैठण मध्ये दाखल;जिल्हा प्रशासनासह पोलिस प्रशासन सज्ज.
जवळ पास 400 पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला
पैठणध्ये आजपासून संत एकनाथ महाराजांच्या मंदिरात नाथषष्ठी महोत्सवाला प्रारंभ झाला
आलो नाथा तुझ्या घरी, भानुदास एकनाथ नाममुखी, ठेव आनंदी सदा...म्हणत राज्यभरातील वारकरी दींड्या पताका घेऊन पैठणमध्ये दाखल झाल्या
Dharashiv News: धाराशिवमध्ये उष्माघाताने १२ शेळ्यांचा मृत्यू, शेतकऱ्याचे २ लाखांचे नुकसानधाराशिव जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढली,तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी येथे उष्माघाताने बारा शेळ्यांचा मृत्यू
शेळी पालकाचे दीड ते दोन लाखांचे झाले नुकसान
शेळी पालक सागर पवार दुपारी जवळच्या तलावात शेळ्यांना पाणी पिण्यासाठी घेऊन गेल्यानंतर तलावातील पाणी पिल्यानंतर लगेच झाला बारा शेळ्यांचा मृत्यू
पशुधन अधिकाऱ्यांनी शेळ्यांची तपासणी केली असता उष्माघाताने मृत्यू झाल्याचे झाले उघड
शासकीय मदत मिळावी अशी शेळीपालक सागर पवार याची मागणी
Beed News: सतीश उर्फ खोक्या भोसलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीसतीश उर्फ खोक्या भोसलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
सतीश उर्फ खोक्या भोसलेची पोलीस कोठडी आज संपली
त्याला शिरूरच्या फौजदारी न्यायालयामध्ये हजर करण्यात आले होते
वकिलांच्या युक्तिवादानंतर सतीश उर्फ खोक्या भोसले ला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली
Nagpur News: प्रशांत कोरटकर यांच्या शोधासाठी कोल्हापूर पोलिसांचे पथक नागपुरात दाखल- प्रशांत कोरटकर यांच्या शोधासाठी कोल्हापूर पोलिसांचे पथक नागपुरात पोहोचले
- छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या विषयी आक्षेपार्य वक्तव्य केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर यांच्याविरुद्ध कोल्हापूर येथील जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे
- या प्रकरणात कोल्हापूर न्यायालयाने प्रशांत कोरटकर यांचा अंतरिम जामीन फेटाळला
- कोल्हापुरातील जुने राजवाडा पोलीस ठाणे स्थानिक गुन्हे शाखा आणि सायबर अशा संयुक्त पथकाकडून प्रशांत कोरटकर यांचा शोध सुरू आहे
- नागपूर परिसरात काही ठिकाणी कोरटकर यांचा शोध घेतलयाची माहिती
Nashik News: कांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्क रद्द करा, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेची मागणीनाशिक -
- राज्यात मुबलक कांदा, त्यामुळे 20 टक्के निर्यात शुल्क रद्द करा, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेची मागणी
- राज्यात मुबलक कांदा आहे की नाही? याबाबत हेलिकॉप्टरने पाहणी करा
- हेलिकॉप्टरने पाहणी करून मुबलक कांदा असल्याची खात्री करून तातडीने मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडून 20 टक्के निर्यात शुल्क रद्द करून घ्यावे
- महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची मागणी
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत केली मागणी
- गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर सातत्यानं कोसळत आहेत
- येत्या काळात कांदा मोठ्या प्रमाणात निर्यात झाला नाही तर अजून दर घसरण्याची भीती
Kolhapur News: कोल्हापूरमध्ये इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचा विहिरीत बुडून मृत्यूकोल्हापूरातील गारगोटी इंजिनिअरिंगचे शिक्षणानिमित्त शासकीय वसतिगृहात राहणाऱ्या एका विद्यार्थ्याचा विहिरीत बुडून मृत्यू झाला.
तानाजी बाजारी हा विद्यार्थी विहिरी शेजारी कपडे धुवत असताना मित्राने चेष्टामस्करी करीत त्याला विहिरीत ढकलले.
तानाजी बाजारी या विद्यार्थ्याला पोहायला येत नसल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला.
या घटनेची नोंद भुदरगड पोलिसात झाली असून याप्रकरणी पोलिसांनी रोहित सुतार या तरुणावर गुन्हा दाखल केलेला आहे.
Nashik News: पूजा खेडकरच्या अडचणी वाढल्या, कुटुंबीयांच्या नावावर १२ कोटींची मलामत्तानाशिक ब्रेक -
- वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकरचं कुटुंब अडचणीत ?
- खेडकर कुटुंबियांचे नॉन क्रिमिलिअर रद्द होणार ?
- खेडकर कुटुंबाच्या नावावर तब्बल १२ कोटी रुपयांची मालमत्ता
Nagpur News: नागपूर हिंसाचारात 60 वाहनांची तोडफोड, 5 जण जखमी, एका घराचे नुकसान- नागपूर हिंसाचारात 60 वाहनांची तोडफोड, 5 जण जखमी, एका घराचे नुकसान
- प्रशासनाकडून नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून प्राथमिक माहिती समोर
- प्राथमिक सर्वेक्षणात 20 दुचाकी,40 चारचाकीचे नुकसान झाले तर 2 क्रेन जाळण्यात आल्या आहेत
- उड्डाणपुलाच्या कामासाठी असणाऱ्या क्रेन जाळण्यात आल्याने सुमारे 70 लाख।रुपयांचे नुकसान झाल्याचा कंस्ट्रक्शन कंपनीचा दावा
Nashik News: सख्ख्या भावांचे हत्या प्रकरण, नाशिक पोलिसांनी ५ जणांना घेतलं ताब्यातनाशिक -
- दोघा सख्या भावांचं खून प्रकरण
- दोघा भावांच्या खून प्रकरणी 5 जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात
- हल्लेखोरांची पोलिसांकडून केली जातेय चौकशी
- रात्री दोघा भावांच्या खुनाच्या घटनेने उडाली होती खळबळ
Pune News: पुण्यात पार्किंगवरून राडा, कोंढव्यामध्ये दोन व्यक्तींकडून एकमेकांना मारहाणपुण्यातील कोंढवा परिसरामध्ये अट्टल गुन्हेगाराकडून गाडीमध्ये पोलिस पाटी लावत पार्किंगच्या वादातून मारहाण
गणेश रागपसरे आणि फरहात यांच्यामध्ये गाडी लावण्यावरून वाद
गणेश व फरात एकमेकांवरती केले वार
दोघांनीही एकमेकांना मारलं
गाडीमध्ये सापडली हत्यारं
कोंढवा पोलिस स्टेशनमध्ये ३०७ चा गुन्हा दाखल
फरहातवर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल