उन्हाळा जवळजवळ सुरू झाला आहे. हवामान खात्याने एप्रिलपासून उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. यावेळी प्रचंड उष्णतेची शक्यता आहे. अशा परिस्थितीत लोकांची अवस्था दयनीय होऊ शकते. कडक ऊन आणि वाहणारा घाम कोणालाही अस्वस्थ करू शकतो. यामुळे तुम्ही उन्हाळ्यात थंड जागी फिरायला जा आणि तिथल्या सुंदर देखाव्यांमध्ये आपला त्रास विसरून काही निवांत क्षण घालवा. चला तर मग जाणून घेऊया.
आज आम्ही तुम्हाला या लेखात एका हिल स्टेशनबद्दल सांगणार आहोत जे स्वित्झर्लंडपेक्षा 100 पट सुंदर आहे. हे तुमच्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन ठरू शकतं. येथे कमी पैसे खर्च करून तुम्ही मौजमजा सुट्टीचा आनंद घेऊ शकाल.
औली एक परफेक्ट डेस्टिनेशन बर्फाच्छादित डोंगर, घनदाट जंगल आणि नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घ्यायचा असेल तर औली तुमच्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन ठरू शकते. उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात वसलेले औली भारताचे मिनी स्वित्झर्लंड म्हणूनही ओळखले जाते. इथल्या बर्फाळ उतारावर स्कीइंगची मजा काही औरच असते. हिमाचलमधील प्रसिद्ध हिल स्टेशन्सपेक्षा ही जागा अधिक सुंदर आहे.
औली केवळ त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठीच नाही तर साहसी खेळांसाठीही ओळखली जाते. उंच टेकड्या, पाइन आणि ओकची घनदाट जंगले पर्यटकांना आकर्षित करतात. आजूबाजूला बर्फाची चादर औलीला नंदनवन बनवते.
उन्हाळ्यात आराम करायचा असेल तर औली हा उत्तम पर्याय ठरू शकतो. हे भारतातील सर्वोत्कृष्ट स्कीइंग डेस्टिनेशन देखील आहे. येथे दरवर्षी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्कीइंग स्पर्धा घेतल्या जातात. स्नो ट्रेकिंग आणि केबल कार राइडचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे.
उन्हाळ्यात औलीमध्ये फिरणे आपल्यासाठी आनंददायक ठरू शकते. या ऋतूत हिरवेगार डोंगर आणि रंगीबेरंगी फुलांनी आच्छादलेली शेतं इथे पाहायला मिळतात.
येथे पोहोचण्यासाठी सर्वात जवळचे रेल्वे स्थानक हरिद्वार (280 किमी) आणि ऋषिकेश (250 किमी) आहेत. याशिवाय डेहराडूनचा जॉली ग्रांट विमानतळ आहे जो 280 किमी अंतरावर आहे. रस्त्याचा मार्ग निवडल्यास जोशीमठहून कॅब, कार किंवा टॅक्सीने औलीला जाता येते.
त्यामुळे आता फार विचार करू नका. आम्ही तुमच्यासाठी उन्हाळ्याचे खास डेस्टिनेशन सांगितले आहे. यासह तुम्ही जवळपासचाही परिसर पाहू शकता. फिरताना सुरक्षेसाठी माहिती नसलेल्या ठिकाणी जाऊ नका. एक गोष्ट दोन वेगवेगळ्या लोकांकडून कन्फर्म करा. कारण, फसवणूक देखील होऊ शकते.