वेळ ठरली, वर्षही ठरले, हा मुस्लिम देश ठरणार तिसर्‍या महायुद्धाचे कारण! बाबा वेंगाची काय भविष्यवाणी
GH News March 21, 2025 01:07 AM

Baba Vanga Prediction For 2025 : तिसर्‍या महायुद्धाची चर्चा दुसर्‍या महायुद्धानंतर लागलीच सुरू झाली. मध्यंतरी अमेरिका आणि तत्कालीन सोव्हिएत युनियनमध्ये शीत युद्ध रंगले. तर भारत, इजिप्त याराष्ट्रांच्या अलिप्ततावादी धोरणामुळे जगात वेगळे चित्र झाले. काही प्रसंगात तर तिसरे महायुद्ध सुरू होणार असे वाटत असताना बड्या राष्ट्रांनी सामंजस्यपण दाखवला. तर प्रसिद्ध भविष्यवेती बाबा वेंगा हिन तिसर्‍या महायुद्धाविषयी भाकीत केल्याचे तिचे अनुयायी दावा करतात आणि त्याविषयीचे वृत्त व्हायरल होते. वर्ष 2025 साठी तिने अनेक भविष्यवाण्या केल्या आहेत. त्याची उत्सुकता संपूर्ण जगाला आहे.

बाबा वेंगाचा जन्म 1911 मध्ये बल्गेरिया या देशात झाला. 1996 मध्ये तिने जगाचा निरोप घेतला. ती जन्माने अंधळी असली तरी तिच्यावर दैवी कृपा असल्याने तिने अनेक भविष्यातील घडामोडी टिपल्याचा दावा तिचे अनुयायी करतात. बाबा वेंगाने कविताच्या माध्यमातून, एका गूढ काव्याच्या रचनेतून या गोष्टी शब्द बद्ध करायला लावल्या. तिच्या या गूढ काव्यातील अनेक प्रसंग घडल्याचा दावा करण्यात येतो. तिने 5000 पेक्षा अधिक वर्षांची म्हणजे जवळपास 5079 पर्यंत भविष्य सांगितल्याचे म्हटले जाते.

वर्ष 2025 साठीचे भाकीत काय?

बाबा वेंगाने भविष्यवाणी केली आहे की, 2025 मध्ये सिरीया या देशाचे पतन सुरू होताच जगात तिसर्‍या महायुद्धाची नांदी सुरू होईल. पूर्व आणि पश्चिम देशांमध्ये तिसरे महायुद्ध होईल. हे युद्ध प्रामुख्याने युरोपमध्ये सुरू होईल. त्यामुळे युरोपातील मनुष्य संख्या झपाट्याने घटेल. इतकेच नाही तर या वर्षातच मानवाचा ब्रह्मांडातील दुसर्‍या समूहाशी पहिला संवाद पण घडेल. या काळात अनेक विनाशकारी घटना घडतील.

ही भविष्यवाणी खरी

सोव्हिएत संघाचे विघटन होणार असे भविष्य खरे ठरेल. या विशालकाय देशाचे अनेक तुकडे झाले. त्यात रशिया हा मोठा देश उदयास आला. तर अमेरिकेवरील 9/11 हल्ला झाल्यानंतर बाबा वेंगाच्या काव्यातील ओळींचा आधार घेत अनेकांनी हे भाष्य खरा ठरल्याचा दावा केला. त्यानंतर बाबा वेंगाच्या गूढ कवितांकडे सर्वांचे लक्ष गेले.

डिस्क्लेमर : या दाव्यांबद्दल पुरेशी आणि ठोस पुरावे किंवा अधिकृत दस्तावेज उपलब्ध नाही. बाबा वांगा यांच्या भविष्यवाण्या साधारणतः अस्पष्ट आणि विविध अर्थांनी सांगण्यात येतात. हा लेख केवळ माहितीपर आणि चर्चेच्या हेतूने देण्यात आला आहे. या दाव्याची टीव्ही ९ मराठी पुष्टी करत नाही.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.