Maharashtra Live Updates : औरंगजेबाच्या कबरीचा वाद, संभाजीनगरमध्ये NIA ची टीम दाखल
Sarkarnama March 21, 2025 02:45 PM
Aurangzeb Tomb : संभाजीनगरमध्ये NIA ची टीम दाखल

औरंगजेब कबरीच्या वादानंतर नागपूरमध्ये उसळलेल्या दंगलीनंतर आता सर्व परिस्थीतीवर लक्ष ठेवण्यासाठी एनआयएची टीम छत्रपती संभाजीनगरात दाखल झाली आहे. तर मराठवाड्यातील जालना, परभणी, नांदेड, बीड, उदगीर याठिकाणी देखील एनआयएची टीम लक्ष ठेवण्यासाठी दौरा करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

University of Pune : पुणे विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र परीक्षा २५ मार्चपासून

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदविका, पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या नियमित, अनुशेष लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा रीक्षा २५ मार्चपासून सुरू होणार आहेत. सर्व मान्यताप्राप्त अभ्यासक्रमांच्या परीक्षांची वेळापत्रके विद्यापीठाच्या ‘www.unipune.ac.in’ या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. विधी अभ्यासक्रम पदवी स्तरावरील प्रथम वर्षाच्या एलएलबी, बीए एलएलबी परीक्षांचे आयोजन महाविद्यालय स्तरावर करण्यात येणार आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरू होण्यापूर्वी अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर हजर राहणे अनिवार्य आहे.

Pune News : पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी एक धक्का

माजी नगरसेविका कल्पना थोरवे यांचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. कल्पना थोरवे यांचे पती संभाजी थोरवे यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला आहे. गुरूवारी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला.

Demand to ban Chhawa Film : छावा सिनेमामुळे नागपुरातील हिंसाचार?

नागपूर येथील दोन समाजातील तणावाला कारण झाल्याचा आरोप करत छावा या बहुचर्चिच चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी मौलानांनी केली आहे. नागपूर पोलिसांच्या हाती लागलेल्या चिथावणीखोर पोस्टमध्ये छावा विरोधात केलेला प्रचार तणावाला कारण झाल्याचा आरोप करत या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे पत्राद्वारे बंदीची मागणी केल्याचंही मौलानांनी सांगितलं आहे. तर या सिनेमात सत्याशी फारकत घेतल्याचा आरोप देखील या पत्रातून करण्यात आला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.